भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावरील कासुर्डीखेबा शिंदेवाडी, वेळु, रांजे व ससेवाडी या ग्रामपंचायतीत मालमत्ता धारकांना घरपटटी पाणीपटटी कर ऑनलाईन भरण्यासाठी पीओएच मॅचलीन, नेट बँंकिंग, एनइएफटी आरटीजीएस, युव्ह पीआय पेमेंट इत्यादी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याद्वारे मालमत्ता धारकांना कर भरणे सुलभ होणार आहे. टप्या टप्याने भोर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना सदरच्या सुविधा पुरवल्या जाणार असून भवितव्य संपुर्ण भोर तालुका कर भरण्यासाठी ऑनलाईन होणार असल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले
ग्रामपंचायतीला देखील कर गोळा करताना येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत.
ॲक्सिस बॅंकेतर्फे या सुविधा ग्रामपंचायतीना प्रदान करणेसाठी आयोजित कार्यक्रमास रणजीत शिवतारे, उपाध्यक्ष जि.प. पुणे शलाकाताई कोंडे, जि प सदस्य पूनम पांगारे, सदस्य भोर प. स. विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी अमोल पांगारे, कुलदीप बोगे, राजू चांदगुडे, आदी उपस्थित होते.
--
चौकट
कर वसुलीत होणार वाढ
ग्रामपंचायतींना घरोघरी जाऊन घरपटटी व पाणीपटटी वसुल करावी लागत होती अनेकदा वसुलीवरुन वादविवाद होण्याचे प्रकार घडत होते याचा नाहक त्रास सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांना सहन करावे लागत होते यामुळे थकबाकी वाढत होती त्यामुळे भोर पंचायत समितीकडुन भोर तालुक्यातील कासुर्डी खेबा, शिंदेवाडी, वेळू ससेवाडी, रांजे या ग्रामपंचायतीच्या वेबसाईट तयार करुन ग्रामपंचायतींना कर वसुलीमध्ये वाढ होणार असून ग्रामस्थांना आधिकच सोई सुविधा पुरवणे ग्रामपंचायतींना शक्य होणार आहे.