कोरोनाकाळात आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यातील लोकांनी व्यवस्था व्हावी यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची व्यवस्था करण्यात आली तसेच अवसरी येथील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या वसतिगृहांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या दोन ठिकाणांमुळे लोकांची मोठी सोय झाली व पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांकडे उपचारासाठी जाणऱ्या लोकांची जवळच सोय झाली.
दिवसेंदिवस कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत आहे. यामध्ये लोकांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, काही यंत्रसामग्री व औषधे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. वेळोवेळी होणाऱ्या बैठकांमधून डॉक्टर व अधिकाऱ्यांकडून समजलेल्या अडचणीं लक्षात घेऊन आमदार निधीतून काही यंत्रसामग्री व औषधे घेण्याचा निर्णय वळसे-पाटील यांनी घेतला व त्यानुसार ८४.५८ लक्ष रुपये आमदार निधी आरोग्य यंत्रणेकडे वळवला. या रकमेतून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बीपाप मशिन, मल्टीप्रा मॉनिटर, बबल सी पॅप, इमरजेन्सी टॅली, क्रास कार्ड इत्यादी साहित्य व औषधे खरेदी केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी ८४.५८ लक्ष jुपयांना प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच या निधीतून ही सामग्री आंबेगाव विधानसभा मतदार संघात येणार आहे.