शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

पोलिसांचे काम जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यांचा एकाला फोन; पण तो निघाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 9:30 PM

पोलीस जनतेशी कशा प्रकारे वागतात .त्यांना उत्तम सेवा देतात का? हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यानी एका व्यक्तीला फोन लावला....

पुणे : एखाद्याला कोणतीही सेवा दिल्यास त्याचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कॉल केला जातो याचा अनुभव अनेकांना असेल. पण पोलीस जनतेशी कशा प्रकारे वागतात .त्यांना उत्तम सेवा देतात का? हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यानी एका व्यक्तीला फोन लावला..त्याच्याकडूनच पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने पोलिसांचे काम उत्तम असल्याची पावती दिली. 

पण तो निघाला राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता. तुमचे पद सांगितल्यामुळे तुम्हाला पोलिसांकडून चांगली वागणूक दिली का? अशी मिश्किल टिप्पणी गृहमंत्र्यांनी केली. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे पोलिसांचे काम जाणून घेण्यासाठी काही विभागांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

सेवाप्रणाली कार्यालयातील समन्वय कर्मचारी पूजा भगत यांनी एका अर्जदाराला फोन केला.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्याशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी अर्जदाराला दिली. 

  एखाद्या व्यक्तीने पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना योग्य ती सेवा आणि मदत दिली जाते का? ते समाधानी आहेत का?  याची तपासणी करण्यासाठी वळसे पाटील यांनी एका व्यक्तीला फोन लावला. रमेश राऊत असे त्यांचे नाव होते. पोलीस व्हेरीफिकेशसाठी मुंढवा पोलीस स्टेशनला गेलो होतो. पोलिसांनी खूप चांगली सेवा दिली असल्याचे त्यांनी सांगताच तुमचे पद बघून चांगली वागणूक दिली का? अशी विचारणा करताच कार्यकर्ता हसला.

पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याबरोबरच त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज पोलीस आयुक्तालयात आलो आहे. पोलीस जनतेला कशा प्रकारे वागणूक देतात हे जाणून घेण्यासाठी एका व्यक्तीला कक्षातून फोन लावला आणि त्यांनी पोलिसांकडून चांगली वागणूक मिळाली असल्याचे सांगितले

टॅग्स :PuneपुणेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड