पुणे : पुणे विभागातील मुख्य तिकीट निरक्षक एन. वी. जोशी यांनी प्रवाशांची गाडीत विसरलेली बॅग परत केली. जोशी हे गोंदिया-कोल्हापूरमध्ये पुणे ते कोल्हापूर दरम्यान आपल्या कर्तव्यावर होते. गाडीत तिकीट तपासात असताना ए-१ डब्यात एक बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. सांगलीला उतरणाऱ्या प्रवाशाने गडबडीत बॅग गाडीत विसरून निघून गेले. जोशी यांनी प्रवाशाचा शोध घेतला; मात्र ते आढळून आले नाही. मग त्यांनी ती बॅग आरपीएफकडे सुपूर्द केली. या नंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित प्रवाशांची संपर्क साधून त्यांना स्थानकावर बोलावून घेतले. ओळख पटल्यावर संबंधित प्रवाशांस ती बॅग परत देण्यात आली. प्रवाशांनी याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. तिकीट निरीक्षकाच्या या प्रामाणिकपणाबाबत वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी कौतुक केले.
तिकीट निरीक्षकाचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:14 AM