याप्रसंगी भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, बाजार समितीचे संचालक शिवाजी वाघोले, उपसरपंच मंगल शेलार, ग्रामविकास अधिकारी ए. जे. लोणकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन वाघोले, बापू शेलार, मनीषा पडळकर, नीलेश भालेराव, ताराबाई टकले, राजश्री शेलार, अविदा आढागळे, लक्ष्मण जाधव, वैशाली देसाई, अनिल पवार आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी अजिंक्य येळे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देलवडी ग्रामपंचायतीने रात्रंदिवस काम केले. देलवडी ग्रामस्थांचे कामगिरी कौतुकास्पद आहे. गावातील राजकीय गट-तट विसरून सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन ‘आईचं बन’ हा सामाजिक उपक्रम सुरू केला. या वेळी सरपंच नीलम काटे, नरेंद्र काटे, वैद्यकीय अधिकारी तुकाराम बनसोडे, राजाभाऊ शेलार, डी. आर. शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील इतर गावांनी देलवडीकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. गावातील पत्रकार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, शाळेतील शिक्षक, पोलीस पाटील, गावातील साफसफाई करणाऱ्या महिला आदी समाजातील सत्तर पुरस्कारर्थींना कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले.
फोटो
देलवडी (ता. दौंड) येथे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करताना मान्यवर.
210721\2437img-20210720-wa0019.jpg
देलवडी तालुका दौंड येथे कोरोणा योद्ध्यांचा सन्मान करताना गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, सरपंच नीलम काटे व मान्यवर