पुणे : महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल २६ जानेवारी २०१७ आणि १५ आॅगस्ट २०१७ रोजी राष्ट्रपतींच्या वतीने पोलीस शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेबाबत राष्ट्रपती पोलीस पदक व पोलीस पदक १०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले होते़ या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सोमवारी प्रदान करण्यात आले़ पुणे शहर व जिल्हा पोलीस दलातील २२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक देऊन गौरविण्यात आले़ याप्रसंगी ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मोहंमद सुवेझ मेहबुब हक यांना पोलीस शौर्यपदकाने गौरविण्यात आले़ रा़ रा़ पोलीस बल विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश मेखला, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ़ जय जाधव, दौंड प्रशिक्षण केंद्र पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पुणे शहर वाहतूक शाखा सहायक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब टोके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश इंगवले, हवालदार रामचंद्र तापकीर, राजेंद्र जगताप, अशोक झोळ, महाराष्ट्र गुप्त वार्ताचे पोलीस उपनिरीक्षक वसंत गवळी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागा सहायक पोलीस उपअधिक्षक हणमंत आवळे, गुन्हे अन्वेषण शाखा सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर रणपिसे, रा. रा. पोलीस बलाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी धुरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पाटील, वसंत गवळी, जीवनकुमार कापुरे, पोपट कड, उल्हास गावकर, केशव हजारे, पोलीस हवालदार पिराजी मोहिते, त्रिंबक घरत, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस हवालदार कमलाकर जाधव उपस्थित होते.या समारंभाला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पदक अलंकरण समारंभाचे नियोजन विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह यांनी केले होते.
पुणे जिल्ह्यातील २२ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:08 PM
महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
ठळक मुद्देपुणे शहर व जिल्हा पोलीस दलातील २२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरवग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मोहंमद सुवेझ मेहबुब हक यांना 'शौर्यपदक'