पुणे : ध्वनीवर्धकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांबाबत पोलिसांकडून मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात येते़. कायद्याचा मान राखून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा़. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सजग रहावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले़. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची बैठक तसेच विघ्नहर्ता न्यास गणेश मंडळे पारितोषिक वितरण समारंभाचे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यात आली होते़. यावेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक,खासदार गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल, आमदार दिलीप कांबळे, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त मितेश घट्टे, स्वप्ना गोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ध्वनीवर्धकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निदेर्शाचे पालन करणे गरजेचे आहे. कोल्हापूरात अनेक मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीत डीजे सिस्टिमचा वापर करण्यात येत होता. कोल्हापूरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले. डीजे यंत्रणेचा वापर न करणाऱ्या मंडळांना बक्षीसे देण्यात आली. त्यानंतर अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणूकीत डीजे यंत्रणेचा वापर करण्याचे टाळले. कायद्याच्या कक्षेत राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा करायला हवा. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या कालावधीत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरण्यासाठी आणखी एक दिवस वाढविण्याची विनंती केली आहे. याबाबत विचारविनिमय करण्यात येत असून प्रशासनाशी चर्चा करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. मानाच्या गणपतींना जो मान दिला जातो, तसाच पोलिसांनी दुसºया दिवशी मिरवणुकीतील इतर मंडळांनाही द्यावा़ मात्र, कार्यकर्त्यांनी कायद्याच्या कक्षेत राहून उत्सव साजरा करावा, असे आवाहन बापट यांनी केले.राम, अगरवाल, टिळक, वेंकटेशम यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मंडळाच्या वतीने अॅड़ प्रताप परदेशी, महेश सूर्यवंशी, भाऊ करपे तसेच अन्य कार्यकत्र्यांनी सूचना मांडल्या. घट्टे यांनी सूत्रसंचलन केले. -------------------------------परवान्याची मुदत वाढविलीगणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना विविध प्रकारची परवानगी मिळवावी लागते. परवान्यासाठी महापालिकेकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शकणाऱ्या मंडळांना ऑफलाइन पद्धतीने परवाने देण्यात येत असून परवाना देण्याची मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे मुक्ता टिळक यांनी सांगितले.
कायद्याचा मान राखून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 5:21 PM
संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सजग राहावे..
ठळक मुद्देविघ्नहर्ता न्यास पारितोषिक वितरण