प्रा.स्नेहा साळवे म्हणाल्या की आपल्या मनातील न्यूनगंड दूर करून व्यक्त होता आलं पाहिजे.स्वतःची प्रेरणा व कर्तृत्व यातून स्वतःला सिद्ध करावं लागतं.स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करून केलेली लढाई ही अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम करते..महिला तक्रार निवारण समिती सदस्या प्रा.रोहिणी रोटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे.आजची स्त्री हि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभावीपणे व उत्कृष्टरित्या आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.ज.यावेळी संकुलातील शिक्षिकांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.सुत्रसंचालन प्रा.अश्विनी खटिंग यांनी केले तर आभार प्रा.संपदा निमसे यांनी मानले.
बेल्हा येथील समर्थ शैक्षणिक संकुलात महिला दिनाच्या निमित्ताने शिक्षिकांचा पुस्तक देऊन सत्कार करताना मान्यवर दिसत आहेत.