निमोणे (ता. शिरूर) येथील वीज उपकेंद्राचे कर्मचारी लहू केदारी व विजय कुलवंत यांच्या छोटेखानी सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
या उपकेंद्राच्या अखत्यारीत १८८ रोहित्रे आहेत. परिसरही मोठा असून विजेची मागणी प्रचंड आहे. गेल्या आठवड्यात सततच्या पावसामुळे सतत वीजपुरवठा खंडित होत असे. मात्र, शेतकरी व नागरिक यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने लहू केदारी व गणेश हरबडे हे सतत फिल्डवर, तर विजय कुलवंत, अतुल खेडेकर, शुभम ढवळे हे कार्यालयीन कर्मचारी नेहमी दक्ष होते. कोरोनाकाळातही या टीमने आपले काम व्यवस्थित बजावले होते. लहू केदारी हे तर १५ दिवसांपूर्वी काम करताना खांबावरून पडून गंभीर जखमी झाले होते. परंतु थोडे दिवस दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले व जीव धोक्यात घालून विद्युत पुरवठा सुरू करू लागले. या चांगल्या कामाची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान केला.
बऱ्याच ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले होतानाच्या बातम्या आपण ऐकतो. परंतु ग्रामस्थांच्या वतीने वीज वितरण कर्मचाऱ्र्यांचा सन्मान एक विशेष बाब म्हणावी लागेल.
या छोटेखानी सन्मानप्रसंगी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्र काळे, ग्रामपंचायत सदस्य संजय काळे, शामकांत ढोरजकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गडकर, राजहंस काळे, नवनाथ गव्हाणे रोहिदास काळे, शामराव जगताप, सुनील चव्हाण, रमेश काळे उपस्थित होते.
निमोणे (ता. शिरूर) येथे वीजवितरण कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना ग्रामस्थ.