जुन्नर : भारतीय समाजात आजही रूढी परंपरा पाळल्या जातात. त्यातूनच विधवा महिलांना धार्मिक विधी, सन, उत्सव या पासून दूर ठेवले जाते. यामुळे या महिलांना त्यांचा सन्मान मिळावा या हेतूने तुळजाभवानी प्रतिष्ठान तर्फे विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पतीनिधनानंतर स्त्रीला स्वतःच स्वतःचा आधार बनून कुटुंबाचा सांभाळ करावा लागतो. परिस्थितीशी दोन हात करत धैर्याने सामना करून विधवा महिला मार्गक्रमण करतात. म्हणूनच समाजाची मानसिकता बदलत या उपक्रमाद्वारे एक नवीन पायंडा पाडण्यात आला. विधवांना हळदीकुंकू लावून भेटवस्तू, तिळगूळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समाजाने विधवा महिलाची अवहेलना न करता त्यांचा सन्मान करावा, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात विद्या फापाळे त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षा उज्ज्वलाताई शेवाळे यांनी जीवनातील सकारात्मकता यावर मार्गदर्शन केले. डॉक्टर वैशाली गायकवाड यांनी वाण आरोग्याच या संदर्भात बोलताना सखोल आहार, आचार, विचार यावर मार्गदर्शन केले. सुवर्णा ढोबळे यांनी स्त्री आणि संघर्ष याविषयी आपले विचार मांडले. याप्रसंगी राधिका कोल्हे, सरिता कलढोणे, स्वप्नजा मोरे, छाया वाळुंज, सुनिता वामन, छाया जोशी, पुष्पा बुट्टे, प्रतिभा केदारी, पूनम तांबे, ऊर्मिला थोरवे, छाया शेवाळे, माधुरी म्हसकर, अंजली दिवेकर, माया खत्री, सुजाता ढोबळे, अनिता ढोबळे, जोत्स्ना वेदपाठक, मनीषा काळे, मनीषा खेडकर, आशा केदारी, मनीषा लोखंडे या सदस्या उपस्थित होत्या.
फोटो ओळ : तुळजाभवानी प्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने उत्सव हळदी-कुंकवाचा सन्मान स्त्री अस्मितेचा या कार्यक्रमा अंतर्गत विधवा महिलांना हळदी-कुंकवाचा सन्मान देण्यात आला. यावेळी उपस्थित महिला वर्ग.