खेड पंचायत समिती सभागृहात उत्कृष्ट सेवेबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सभापती भगवान पोखरकर उपसभापती चांगदेव शिवेकर, गटविकास अधिकारी अजय जोशी, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे,पंचायत समिती सदस्य अरुण चौधरी, अंकुश राक्षे, ज्योती अरगडे, मच्छिंद्र गावडे, सुनिता सांडभोर, नंदा सुकाळे आदिसह अधिकारी उपस्थित होते.
कुरुळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका छाया विरणक, कडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका निलिमा जाधव, वडगाव घेनंद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सपना शिंदे, सोळु ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मोहिनी कडु, केळगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका भारती मेहत्रे, वाकी खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका जयश्री काळोखे आणि पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शैलैजा कुदळे यांचा सन्मान करण्यात आला..
जाँबकार्ड लिकिंग करुन घरकुल योजनेतील आदिवासी भागातील लाभार्थ्यांना घरकुले पुर्ण करण्यास प्रोत्साहन देणा-या नायफड गावच्या ग्रामसेविका शितल लकारे, शिरगावच्या ग्रामसेविका निलिमा लेंडे, टोकवडेच्या ग्रामसेविका अलका राहणे आणि येणिवेच्या ग्रामसेविका विद्या केदारी यांचाही जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
जिल्हा ग्रामीण विकास यत्रंणा विभाग सांख्यिकी विस्तार अधिकारी अनिता ससाणे आणि पंचायत समिती विस्तार अधिकारी सुखदेव सांळुखे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे यांनी सुत्रसंचालन केले.
फोटो ओळ: कोरोनाच्या काळात उत्कृष्ट गावपातळीवर चांगले काम केल्याबदल महिला ग्रामसेविकांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला..