शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

मुख्यमंत्र्यांच्या दटावणीनंतर वहिनी-नाना-भाऊ-अण्णा-दादा सुधारणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 1:26 PM

सर्व नियम धाब्यावर बसवत पदपथ, ‘सिग्नल’चे खांब, चौक, दुभाजक, झाडे अशा मिळेल.. त्या सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या छबी बेकायदेशीररित्या झळकावल्या आहेत.

ठळक मुद्देबेकायदा फ्लेक्सबाजीने घालवली पुण्याची रयामहापालिकेची बघ्याची भूमिकाशहरातील आठही विधानसभा मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी प्रचंड वाढलीझाडे कापणाऱ्यांवर गुन्हे दाखल कराअनधिकृत ‘फ्लेक्स’ लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात किंवा अन्य कारवाईचा निर्णय घेऊ

पुणे : सध्या संपूर्ण शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सन २०१९ ची जय्यत तयारी सूरु आहे. यासाठी पुणेकरांना शहर, स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार नेते-कार्यकर्त्यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी शहराला वेठीस धरल्याची विचित्र स्थिती शहरभर निर्माण झाली आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त सत्ताधारी भाजपच्या ‘उत्साही’ आमदार, नगरसेवक, आमदारेच्छुक कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरभर फलकबाजी करुन ‘स्वच्छ पुणे मोहिमे’ला हरताळ फासला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवत पदपथ, ‘सिग्नल’चे खांब, चौक, दुभाजक, झाडे अशा मिळेल त्या सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या छबी बेकायदेशीररित्या झळकावल्या आहेत. एरवी सर्वसामान्यांच्या विरोधात कारवाई करण्याची कर्तव्यदक्षता दाखवणारी महापालिका या ‘माननियांच्या’ सर्रास कायदेभंगाकडे मात्र डोळे झाकून बघत आहे.      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवार संध्याकाळपासून रविवारी दुपारपर्यंत पुण्याच्या विविध भागातून मार्गस्थ झाली. यावेळी संपूर्ण शहरातली प्रमुख रस्त्यांवर फलकबाजी, स्वागत कक्षांची उभारणी, फटाक्यांची आतिषबाजी, प्रचंड मोठ्या वजनी हारांसाठी क्रेन आणणे, रंगेबेरंगी कागदाच्या तुकड्याचा वर्षाव करणे आदीची स्पर्धाच भाजपाच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये लागली होती. ही चुरस एवढी टोकाला गेली की कोथरुडमधल्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क हाणामारी झाली. स्वपक्षातल्याच स्पर्धकाचे चेहरे मुख्यमंत्र्यांसमोर झळकू नयेत यासाठी भाजपा पदाधिकाºयांनी प्रयत्न केले. हे सर्व उद्योग सगळे नियम पायदळी तुडवून करण्यात आले. यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. 

चौकटफलकबाजीवरुन इच्छुकांमध्ये वाद-हाणामारीशहरातील आठही विधानसभा मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी प्रचंड वाढली आहे. काही मतदार संघात विद्यमान आमदार विरुद्ध अन्य इच्छुक असा जोरदार संघर्ष अलिकडच्या काळात उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेनिमित्ताने या वादांचे जाहीर प्रदर्शन घडले. मोक्याच्या जागा मिळवण्याच्या इर्षेतून हे प्रकार घडले. 

.......आधी स्वच्छता; मग कारवाईशहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान सन २०१९’ची कार्यवाही सुरु आहे. यामुळे प्रथम संपूर्ण शहरातील अनधिकृत फ्लेक्स काढण्याच्या सूचना सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. कोणत्या भागात किती बेकायदेशीर ‘फ्लेक्स’ लावले आहेत याचा अहवाल मागवला आहे. आमचे प्राधान्य शहर स्वच्छ करण्याला असून त्यानंतर अनधिकृत ‘फ्लेक्स’ लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात किंवा अन्य कारवाईचा निर्णय घेऊ.-शंतनू गोयल, अतिरिक्त आयुक्त 

............झाडे कापणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी सिंहगड रस्त्यावरील मोठ्या झाडांच्या फांद्या तोडल्या गेल्या आहेत. यात्रेला अडथळा होण्याची शक्यता नसतानाही केवळ मनमानी पध्दतीने महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत झाडांच्या मोठ्या फांद्या निष्काळजीपणाने तोडल्या आहेत. एरवी सर्वसामान्य माणसाला छोटी फांदी कापायची असेल तर ती परवानगी शिवाय तोडता येत नाही. सरकार एकीकडे ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची जाहीरात करत असताना दुसरीकडे भाजपाच्या जाहीरातींसाठी वृक्षतोड केली जात आहे. क्रूर पध्दतीने झाडे कापणाºयांवर पालिकेने व पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखला करून पुढील कारवाई करावी.- वंदना चव्हाण, खासदार

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका