तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार चक्क काही कर्मचारी आणि शिपायांच्या हाती असून, पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने नागरिकांना जनावरांसाठी लस उपलब्ध होत नसल्याने शिरूर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये तातडीने वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
शिरुर तालुक्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयांचे सर्वेक्षण नुकतेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप,सतीश जगताप, पंडित मासळकर,अशोक मोरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. तळेगाव ढमढेरे व मांडवगण फराटा येथे अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांच्या हाती कारभार असल्याचे तसेच एक वर्षापासून औषध पुरवठा उपलब्ध नाही, उपचारांचे दरपत्रक नाही, औषध साठा फलक नाही, जनावरांना उपचार केल्याबाबतची पावती दिली जात नाही, वरिष्ठ कार्यालयांचे पत्ते व संपर्क क्रमांक नाही, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र इमारती असून देखील गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली निवासी इमारती धूळखात पडून आहे. सध्या अनेक ठिकाणी जनावरांना लंपी स्कीन, लाळ्या खुरकत रोगाची लागण होत असून देखील याबाबत लसी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर शिरूर तालुक्याला पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने एका ठिकाणच्या डॉक्टरकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. करंदी येथील डॉक्टरांकडे तळेगाव ढमढेरे येथील अतिरिक्त कारभार देण्यात आल्याचे समोर आले असून शिरूर तालुक्यात तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यात अनेक पदे रिक्त असून माझ्याकडे देखील तालुक्याचा प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार देण्यात आलेला आहे. सध्या शासकीय पातळीवरून रिक्त पदे भरण्याबाबत काही हालचाली असून वरिष्ठ पातळीवर पदे भरली गेल्यास शिरूर तालुक्यातील रिक्त पदे भरले जातील व समस्या सुटेल.
-नवनाथ पडवळ
प्रभारी शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी
तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देताना ग्राहक पंचायतचे पदाधिकारी.
140921\1552-img-20210914-wa0009.jpg
व्हिडिओ गम भरे गीते दवाखान्याची पाहणी करताना पंचायतीचे कार्यकर्ते