शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रुग्णालयाचा कचरा उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2015 3:56 AM

पुणे जिल्ह्यातील शासनाचे सर्वात मोठे रुग्णालय अशी ख्याती असलेल्या औंध येथील जिल्हा रुग्णालय आणि उरो रुग्णालयांमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच नाही.

- राहुल कलाल, पुणेपुणे जिल्ह्यातील शासनाचे सर्वात मोठे रुग्णालय अशी ख्याती असलेल्या औंध येथील जिल्हा रुग्णालय आणि उरो रुग्णालयांमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच नाही. या दोन्ही रुग्णालयांकडून घातक जैववैद्यकीय कचरा परिसरात उघड्यावर टाकण्यात येत असल्याने मानवी आरोग्यासह पक्षी, प्राणी यांच्या आरोग्यासही घातक असलेल्या या कचऱ्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काणाडोळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. पुणे जिल्हयासाठी औंध येथील काही एकर जागेमध्ये जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर या परिसरात क्षयरुग्णांंवर उपचारासाठी औंध उरो रुग्णालयही आहे. या दोन्ही रुग्णालयांची अवस्था दयनीय असल्याचे चित्र आहे. प्रत्येक रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण संरक्षण कायदा केला आणि त्यात जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यपद्धती ठरवून दिली आहे. हा कायदा राज्यात राज्य शासनाकडून राबविण्यात येतो. जी खासगी रुग्णालये हा नियम पाळत नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. पण खुद्द सरकारच्या मालकीची असलेली रुग्णालयेच हा नियम पाळत नसल्याचे धडधडीत सत्य समोर आले आहे. औंध रुग्णालयाच्या परिसरात जैववैद्यकीय कचरा जाळण्यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो बंद आहे. त्या भागातील मशीन गंजल्या असून, भागात झाडे उगवली आहेत. त्या विभागाबाहेर दोन्ही रुग्णालयांकडून जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात आहे. यामध्ये रक्ताच्या पिशव्या, इंजेक्शन-सुया, रक्ताने माखलेले कापूस, बॅन्डेज, सलाईनच्या बाटल्या, शवागृहात वापरण्यात आलेला बर्फ, मुत्राच्या पिशव्या, क्षयरुग्णांवर उपचारासाठी वापरले जाणारे मास्क आदींचा समावेश आहे. हा कचरा या परिसरात सुमारे १ एकर भागात पसरला आहे. हा कचरा पक्षी खात असल्याने त्यांच्या जिवीताचाही प्रश्न उपस्थित होत आहे.रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपालईन फुटल्या असून त्यांची अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यात दुषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले जात आहे. मात्र त्याकडे रुग्णालय प्रशासनाने डोळेझाक केली आहे.परिसरात दारूपार्ट्याऔंध उरो रुग्णालयाच्या परिसरातील रस्त्यांवर सायंकाळनंतर दारूपाटर्या भरत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर या रस्त्यांवर अंधाराचा फायदा घेऊन प्रेमी युगल बसतात. त्यामुळे या रस्त्यांवरून सायंकाळनंतर परिसरात राहणाऱ्या महिला व मुलींना ये-जा करणे अवघड जात आहे. मात्र, याकडे रुग्णालय प्रशासनासह पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे.वसाहती मरणासन्नरुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिसरात वसाहत वसविण्यात आली आहे. ती बांधून अनेक वर्षे उलटून गेली आहेत आणि अनेक इमारती या धोकादायक अवस्थेत आहेत. या इमारतींची अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्तीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या पडण्याच्या अवस्थेत आहेत.