बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरातील रूफ टफ हॉटेल व बारवर सुरक्षेचा विचार करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीमंत राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.बाणेर-बालेवाडी परिसरात इमारतीच्या टेरेसवर हॉटेल सुरू आहेत. या हॉटेलमध्ये जाण्यासाठी पुरेशी सुरक्षितता नाही. अपघात झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. बाणेर-औंध हद्दीत अनेक ठिकाणी परवानगी न घेता हॉटेल सुरू आहेत. यावर कारवाई होत नाही. रात्री-अपरात्री अनेक हॉटेलसमोर रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. अनधिकृत हॉटेलच्यामुळे पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या यंत्रणेवरील ताणदेखील वाढला आहे. बाणेर बालेवाडीत पालिकेने सर्व हॉटेलची पाहणी करून अनधिकृत हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीमंत राजे प्रतिष्ठानच्या वतीने संतोष चव्हाण यांच्या वतीने केली आहे. नगरसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या, बाणेर-बालेवाडी परिसरात इमारतीच्या वर असलेल्या हॉटेलवर कारवाई संपूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे. प्रशासन अपेक्षित कडक कारवाई करेल असा विश्वास आहे.
बाणेर-बालेवाडी परिसरात बिनदिक्कतपणे टेरेसवर सुरू आहेत हॉटेल अन् बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:31 PM