शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

Pune: पिस्तुलाचा धाक दाखवून हॉटेल वैशालीची जबरदस्तीने घेतली पॉवर ऑफ अटॉर्नी

By विवेक भुसे | Published: June 19, 2023 10:04 AM

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल...

पुणे : फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटॉर्नी पिस्तुलाचा धाक दाखवून घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका विवाहितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून १८ जून २०२३ पर्यंत सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती विश्वजीत याने २०१८ मध्ये फिर्यादी यांना त्यांच्या घोले रोड येथील घरी दारु व ड्रग्ज पाजून त्यांच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. लग्नानंतर त्यांना संगनमताने मारहाण करुन शारीरीक व मानसिक छळ केला. विश्वजीत याने पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ अटॉर्नी करुन फिर्यादीचे वडिलांचे वैशाली हॉटेल, त्यांच्यावर नावावर करुन घेतले.

कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या कोट्यावधींच्या ४ कारची परस्पर विक्री करुन फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीचे १ कोटी ७० लाख रुपयांचे लग्नातील दागिने व वस्तू तसेच दोन कार घेऊन तो व त्यांचा भाऊ वापरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक विक्रम गौड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड