पुणे : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आता सगळ्यांनाच वेध लागले असतील ते नववर्षाच्या स्वागताचे. काहींनी आधीच प्लॅन तयार केले असतील तर काहींचे प्लॅन अजून तयार होत असतील. उबदार थंडीलाही सुरुवात झाली आहे. नववर्षानिमित्त अनेक कॅफे, पब, हॉटेल्सही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देऊ करतात. अनेक पब आणि क्लबमध्ये पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. एकंदरीत काय, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाकडून नववर्षाचं स्वागत दणक्यात झालं पाहिजे असं प्रत्येक हॉटेल, पबचालकांना वाटत असतं. म्हणून तेही त्यांच्यापरीने वेगवेगळ्या सुख-सुविधा आपल्या हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. पुण्यात अनेक हॉटेल्स, पब आहेत जिथं अशा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. तुम्हीही यंदा नववर्षात पुण्यात जाणार असाल किंवा पुण्यातच असाल तर आम्ही खाली दिलेल्या स्थळांना नक्की भेट देऊन पहा.
पाशा लॉन्ज
पुणे येथील सेनापती बापट रोडवरील पाशा लॉन्ज हे पुण्यातील सगळ्यात प्रसिद्ध लॉन्ज आहे. रुफटॉपवर असलेलं हे हॉटेल नववर्षाच्या स्वागतासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या आवडत्या प्रियजनांसोबत चांदण्याच्या प्रकाशाखाली सुमधूर संगीताच्या सानिध्यात तुम्ही तुमच्या नववर्षाची सुरुवात करू शकता.
दि वेस्ट इन
मुंढवा रोडवरील कोरेगाव पार्कातील हे हॉटेल डिनर, पार्टीसाठी फार प्रसिद्ध आहे. तुमच्या आयुष्यात सगळ्यात सुंदर आणि मनोरंजक रात्र तुम्हाला बनवायची असेल तर दि वेस्टीनला भेट द्यायलाच हवी. कारण इथं केवळ श्रवणीय संगीतासोबतच चविष्ट डिनर आणि विविध प्रकारच्या पेयांचा यथेच्छ आनंद घेऊ शकता.
दि फ्लाईंग सॉसर बार
पुण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री प्रचंड गर्दी असते. सगळीकडे झगमगाट असतो. पण या सगळ्या गोंधळातून तुम्हाला शांत ठिकाणी नववर्षाचं स्वागत करायचं असेल तर दि फ्लाईंग सॉसर बार हे रेस्टॉरंट उत्कृष्ट आहे. विमान नगरमधील लुकांडा स्काय विस्टाच्या टेरेसवर हा रेस्टॉरंट आहे.
आणखी वाचा - मुंबई-पुण्यानजीकची ही लोकप्रिय हनिमून डेस्टीनेशन्स
स्विग
हॉटेलचं सुंदर बांधकाम, डोळे दिपवतील असे इंटेरिअर आणि आजूबाजूला सुरू असलेलं सुमधूर संगीत आपल्याला नक्कीच मंत्रमुग्ध करतात. असाच अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर स्विग हे हॉटेल अत्यंत चांगलं उदाहरण आहे. कोरेगाव पार्कातील एसबीआय ट्रेनिंग सेंटरमध्ये हे हॉटेल आहे.
डॉव्हनिंग स्ट्रट
या हॉटेलजवळ दिवाळीतील फटाक्यांच्या आतिषबाजीसारखा झगमगाट असतो. त्याच उत्साहात तुम्हाला नववर्षाचं स्वागत करायचं असेल तर डॉव्हनिंग स्ट्रीट हे हॉटेल तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जेवण आणि पेयाची लूट करत डीजेच्या तालावर मंत्रमुग्ध व्हायचं असेल तर याठिकाणी नक्की भेट द्या. ढोले पाटील रोडवरील संमगवाडी येथील सिटी पाँईटवर हे हॉटेल आहे.
दि ऑर्किड
पुणे-बँगलोर रोडवर असलेलं हे दि ऑर्किड हे हॉटेल लाईव्ह म्युझिक, डिजे, अनलिमिडेट खाणं आणि पेय, गेमसाठी प्रसिद्ध आहे. नववर्षाचं स्वागत अशा हटके पद्धतीने होणार असेल तर इथं जायला कोणाला आवडणार नाही? त्यामुळे अनेक तरुणांची इथं प्रत्येक ३१ डिसेंबरला गर्दी होते.
दि सेंट्रल पार्क
३१ डिसेंबरची रात्र आणि नववर्षाची पहाट तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या कल्पनेने साजरी करायची असेल तर दि सेंट्रल पार्क हॉटेल सगळ्यात बेस्ट आहे. एका रुफटॉपवर असलेल्या या हॉटेलमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने नववर्ष साजरा करता येईल. आगरकर नगर येथील बंद गार्डन रोडवर हे हॉटेल आहे.
दि इरीश हाऊस
डिस्को पार्टी, नृत्याची धम्माल, आतिषबाजी, भरपूर खाण्याची चंगळ अशा मस्त वातावरणात नववर्षाचं स्वागत करायचं असेल तर, दि इरीश हाऊसला भेट द्याच. विमान नगरच्या फिओनिक्स मार्केट सिटी येथे असलेलं हे हॉटेल नववर्षाच्या स्वागत पार्टीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.