शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

hoto from Dipak Munot वेध विलिनीकरणाचे : न्यू कोपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:11 AM

.......... न्यू कोपरेवासीयांच्या विलिनीकरणानंतर मोठ्या अपेक्षा दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विकसित कर्वेनगरशेजारी असूनही गावपण राखणाऱ्या ...

.......... न्यू कोपरेवासीयांच्या विलिनीकरणानंतर मोठ्या अपेक्षा

दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विकसित कर्वेनगरशेजारी असूनही गावपण राखणाऱ्या न्यू कोपरे गावाला अद्यापही पीएमपी बससेवेची प्रतीक्षा आहे. पुनर्वसन होऊनही अनेक सुविधांची वानवा असल्याने ग्रामस्थांचा आता विकासासाठी भरवसा आहे तो महापालिकेवरच. त्या अपेक्षेनेच येथील रहिवासी विलिनीकरणाचे स्वागत करताहेत.

न्यू कोपरेत भूमिगत गटारव्यवस्था आणि कचरा समस्या नागरिकांना सतावत आहे. अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून पिण्याच्या पाण्यासाठी जल प्राधिकरण अधिक पैसे आकारत आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था होऊनही रोज दुर्गंधित जीवन जगावे लागत असल्याने साथीचे रोग पसरत आहेत. विकासकामांसाठी निधी अपुरा पडत असून पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर तरी आमची कामे पहिल्यांदाच मार्गी लागतील या आशेने गावकरी विलिनीकरणाचे स्वागत करतात.

गावात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग गावात असल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

खडकवासला धरणामुळे पुनर्वसित झालेल्या या गावाची लोकसंख्या पाच हजारच्या आसपास असून विकासकामे होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्ता शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्याच्या कामासाठी लवकरात लवकर विशेष तरतूद करावी, अशी मागणी येथील तरुणांनी केली. रोजंदारीवर काम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला महानगरपालिकेची करव्यवस्था परवडणार का, असाही सवाल गावकरी करतात.

कोट

आमच्या गावात ड्रेनेज लाईन,दिवाबत्ती आणि विरंगुळा केंद्र ही कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महापालिकेकडून प्रथम ही कामे पूर्ण व्हावीत ही अपेक्षा आहे.

- दीपाली भांगे, सरपंच

विलीनीकरण झाल्यानंतर गावातील शेतजमिनीवर आरक्षण पडू नये.

-मनिषा मोरे, उपसरपंच

पुनर्वसनाचा मुद्दा

न्यू कोपरे गावाची जागा खडकवासला धरणात गेल्याने गावाला अनेकदा पुनवर्सनाला सामोरे जावे लागले. प्रशासनाने न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी ३८ एकर क्षेत्र बहाल केले. गाव विकसित करण्यासाठी एका विकासकाला ग्रामस्थांनी जागा दिल्या. त्यातून काहींचे पुनर्वसन झाले, काहींचे अजूनही झाले नसल्याची तक्रार गावकरी करतात.

फोटो ओळ: कोपरे गावातील ड्रेनेजची कामे वेगवेगळ्या भागात सुरू आहेत. त्यामुळे मंदिराशेजारी तयार असलेला सिमेंटचा रस्ता उखडण्यात आला आहे.