पुणे : कोराेना नियमावलीला नागरिकांनी फासलेला हरताळ, ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीत झालेली वाढ यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात रोज ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर ५० पेक्षा जास्त गावात १० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. यात बारामती, शिरूर, हवेली तालुका सर्वाधिक गावे हॉटस्पॉट आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ जिल्ह्यातही सक्रिय कोरोना बाधित वाढले आहे. यामुळे गेल्या वर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जो रुग्णवाढीचा वेग होता तो पुन्हा या वर्षीही वाढायला लागले आहे. रुग्णवाढीचा हा वेग कायम राहिल्यास पुन्हा जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनकडे तर होत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिका व निमशहरी क्षेत्रात रुग्णसंख्येत वाढ होताना आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. ५० गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने ही हॉटस्पॉट म्हणून प्रशासनाने जाहीर केले आहे. यात बारामती, शिरूर आणि हवेली तालुक्यात सर्वाधिक गावांची संख्या आहे.
प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असला तरी नागरिक अजुनही बेफिकीरपणे वागत आहे. शासनाने लावलेले निर्बंध पाळले जात नसल्याने गेल्या दोन आठवड्यापासून रूग्ण संख्या वाढत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला केवळ इंदापूर, शिरूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सापडत होते. मात्र, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. भोर, वेल्हा, मावळ तालुक्यात हे प्रमाण कमी आहे. हॉटस्पॉट गावात १० गावे ही नगरपालिका क्षेत्रातील आहेत. तर ४० गावे ही ग्रामपंचायत क्षेत्रातील आहे. नागरिकांनी शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन करावे, सभा समारंभ, लग्नकार्यातील गर्दी टाळावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संक्षिप्त माहिती
तपासणी करण्यात आलेलेले एकूण रुग्ण : ५,११,०३७कोरोनाबाधित रुग्ण ९५९५६ (११.८ टक्के)
कोरोनाबाधित मृत्यू २,२०५ (२.३ टक्के)रुग्णालयातून घरी सोडलेले एकूण रुग्ण ९१२२७(९५.१ टक्के)सध्या क्रियाशील रूग्ण २५२४ (२.६ टक्के)
जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त रूग्ण असलेली तालुकानिहाय गावे
आंबेगाव: घोडेगाव(२१), अवसरी खुर्द (१६), मंचर (६८)बारामती : माळेगाव बुद्रुक (३१), पणदरे (२७), काटेवाडी (१२), सुपे (१०), बारामती नगरपालिका क्षेत्र (२०७)
दौंड : यवत (१३), केडगाव (११), दौंड नगरपालिका (३६)हवेली : नांदेड (४५), नऱ्हे (५८), मांजरी बुद्रुक (२३), कदमवाकवस्ती (१२), उरूळी कांचन (४६), वाघोली (१३६), केसनंद (१४), लोणी काळभोर (१८)
इंदापुर : भिगवण (१९), पिंपळे (४२), इंदापूर नगरपालिका (४२)जुन्नर : उंब्रज (२१), नारायणगाव (३२), वारूळवाडी (१२), जुन्नर नगरपालिका (२१)
खेड : कुरूळी (३५), मेदणकरवाडी(१४), निघोजे (१३), आळंदी नगरपालिका (३४), चाकण नगरपालिका (४४), राजगुरूनगर नगरपालिका (२७)मावळ : लोणावळा नगरपालिका (२८), तळेगाव नगरपालिका (७२)
मुळशी : भुगाव(१०), हिंजेवाडी (२१), सुस (२०)पुरंदर : कोळविहिरे (११), आंबोडी (१०), नावळी (१०), नीरा (१०), सासवड नगरपालिका (६९)
शिरूर : शिक्रापूर (४०), तळेगाव ढमढेरे (१७), रांजणगाव गणपती (२१), मांडवगण फराटा (१०), नाव्हरे (१२), शिरूर ग्रामीण (३२), शिरूर नगरपालिका (५१), करडे (११)--------------
जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांचा तपशील
तालुका एकुण क्रियाशील रूग्णबाधित दर मृत्यूदर क्रियाशील कंटेनमेंट झोनआंबेगाव १३८ १७.३० २.२ ४२
बारामती ३८३ २०.३० १.७ १२८भोर ३३ १६.९० ३.६ १२
दौंड ११२ २२.२० २.६ २५हवेली ४७८ २०.६२ १.७ ३३०
इंदापूर २१९ १६.०९ २.३ ४८जुन्नर १७२ २२.९१ ३.१ ६०
खेड २४९ २२.९६ २.२ ४५मावळ १४८ २१.४१ ३.० ३८
मुळशी ९५ १०.४९ २.३ ३१पुरंदर २०८ १९.१० ३.१ ३४
शिरूर २८४ १९.४७ २.४ ६३वेल्हा ५ १४.२३ २.९ ४
एकूण २५२४ ११.७७ २.३ ८६०----जिल्ह्यात मास्क वापराबाबत करण्यात आलेली दंडात्मक कारवाई
नगरपालिका क्षेत्रदंड करण्यात आलेल्या एकुण व्यक्ती १५,९०५
आकारण्यात आलेला दंड ५५,३५,८७०पोलिस
दंड करण्यात आलेल्या एकूण व्यक्ती १,९०.७७६आकारण्यात आलेला दंड ३,७२,३३,१००
ग्रामपंचायतदंड करण्यात आलेल्या एकूण व्यक्ती ४९,७२५
आकारण्यात आलेला दंड १,५५,५०,४००जिल्ह्यात आतापर्यंत ५,८३,१९,३७० रूपयांचा दंड वसूल केला आहे....
जिल्ह्यात रूग्णांच्या नमुना तपासणीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे बाधित रूग्णांची संख्याही वाढत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व शासनाने आखुन दिलेल्या कोरोना नियमावलीचे पालक करावे. तसेच संध्या कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. आपल्या जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा लसीकरण केंद्रात ४५ ते५९ आणि ६० पेक्षा जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकांनी लसीकरण करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.