शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

रंगरेषांच्या जादूगारासोबत रंगला बालचमूंचा तास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 6:54 PM

कॅनव्हासवर चित्र रेखाटणा-या रंगरेषेच्या जादूगारासोबत बिनभिंतीच्या शाळेमध्ये बालचमूंचा तास भरला.

ठळक मुद्देनववर्षाच्या पार्टीपेक्षा अनाथ मुलांसाठी स्नेहभोजनाचा एक अनोखा उपक्रम

पुणे : कृतज्ञता हा सुंदर दागिना प्रत्येक माणसाकडे असायला हवा, असे सांगत कॅनव्हासवर चित्र रेखाटणा-या रंगरेषेच्या जादूगारासोबत बिनभिंतीच्या शाळेमध्ये बालचमूंचा तास भरला. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि.द.फडणीस आजोबा या तासाला शिकवायला होते. पुण्यातील सण-उत्सवांपासून ते यश-अपयश पचविण्याच्या शक्तीविषयी सांगणारे हे वयाची नव्वदी पार केलेले रंगरेषेचे जादूगार समोर पाहून प्रत्येक चिमुकला कुतुहलाने त्यांचे विचार ऐकत होता. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता आणि वेंकीज उद्योग समूहाचे संचालक व्यंकटेश राव यांच्या वाढदिवसानिमित्त मंडईतील एकलव्य फाऊंडेशनमध्ये अनाथ मुलांकरीता आयोजित स्नेहभोजनाचे. यावेळी शकुंतला फडणीस, सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष व्ही.व्ही.आंबेकर, स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, एकलव्य फाऊंडेशनच्या रेणू गावस्कर, मनिषा धारणे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, मोहन ढमढेरे, अभिनेत्री गिरीजा पाटील आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष आहे. बालकलाकार शांभवी भरेकर, साक्षी मेठे यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात आला. संस्थेत आलेले पाहुणे चक्क आपल्याला जेवण वाढतायंत हे पाहून थक्क झालेल्या मुलांनी रुचकर जेवणाचा आनंद देखील घेतला. लाखो रुपयांची उधळपट्टी करीत ठिकठिकाणी रंगणा-या नववर्षाच्या पार्टीपेक्षा अनाथ मुलांसाठी स्नेहभोजनाचा एक अनोखा उपक्रम राबवित सरत्या वर्षाला निरोप देत मंडई परिसरातील तरुणांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.शि.द.फडणीस म्हणाले, उत्सव अनेक होतात, धार्मिक संस्थांचा त्यामध्ये मोठा सहभाग असतो. त्यामुळे आता समाजातील उणीवा भरुन काढण्याचे काम करणारी मंदिरे वाढणे गरजेचे आहे. ज्ञान देणारी व समाजासाठी काहीतरी करणारी मंदिरे व्हायला हवी. प्रत्येकाने आयुष्यात अनेक गोष्टी शिकायला हव्या. यश-अपयश पचविण्याची ताकद असेल, तर आपण यशस्वी होऊ शकतो. रेणू गावस्कर म्हणाल्या, समाजातील कर्तृत्वाने मोठे असलेल्या व्यक्तींचा परिसस्पर्श लाभणे, हा विलक्षण योग आहे. जे पुस्तक किंवा शालेय शिक्षण शिकवू शकत नाही, ते या साध्या माणसांकडून शिकायला मिळते. त्यामुळे अंगावरील सोन्यापेक्षा समाजासाठी काम करणारी ही दागिन्यांसारखी व्यक्तिमत्वे अत्यंत महत्वाची आहेत. चिमुकल्यांनी जादूचे प्रयोग व टॅटू मेकिंग चा आनंद लुटला. श्रद्धा भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणेartकलाpaintingचित्रकला