शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घरफोड्या करणारी के. आर. टोळी जेरबंद; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By नारायण बडगुजर | Published: August 17, 2023 7:34 PM

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली...

पिंपरी : दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या के. आर. टोळीचा म्होरक्या किरण राठोड याच्यासह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चोरीचे दागिने घेणाऱ्या तीन सोनारांना देखील करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.

किरण गुरुनाथ राठोड (वय २६, रा. दिघी), अर्जुन कल्लप्पा सूर्यवंशी (वय १९, रा. कोरेगाव भीमा), संतोश जयहिंद गुप्ता (वय १८, रा. खंडोबा माळ, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी -चिंचवड शहर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून घरफोड्या करणारा के. आर. टोळीचा म्होरक्या दिघी परिसरात ओळख लपवून वास्तव्य करीत आहे, अशी माहिती दरोडा विरोधी पथकातील दिवंगत पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये यांना मिळाली. त्यानुसार दिघी परिसरात सापळा लावून किरण राठोड याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कार, १८७ ग्रॅम सोने, एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण १२ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

किरण राठोड हा पाच घरफोड्या आणि एक दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपींनी चोरलेले दागिने कोरेगाव भीमा येथील दोन आणि परभणी येथील एका सराफ व्यावसायिकाकडे विकला. या तीनही व्यावसायिकांसह दागिने विक्रीसाठी मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी आरोपी केले.   पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश हिंगे, गणेश कोकणे, उमेश पुलगम, समीर रासकर, अमर कदम, महेश खांडे, नितीन लोखंडे, सागर शेडगे, राहुल खारगे, चिंतामण सुपे, औदुंबर रोंगे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

पोलिस अंमलदाराचे अवयव दान

दरोडा पथकाचे पोलिस अमंलदार राजेश कौशल्ये यांनी या कारवाईत मोठी कामगिरी केली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी राजेश यांचे अवयव दान केले. मृत्यूनंतरही राजेश हे समाजासाठी आदर्श घालून गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरी