शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

नीरेत तारांच्या घर्षणाने एका घराला आग

By admin | Published: May 11, 2017 4:10 AM

वीजवाहक तारांच्या घर्षणाने नीरेतील एका घराला आग लागली. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे दोन लाख

लोकमत न्यूज नेटवर्कनीरा : वीजवाहक तारांच्या घर्षणाने नीरेतील एका घराला आग लागली. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नीरेतील प्रभाग चारमधील साई मंदिराशेजारील कौलारू चाळीतील राजेंद्र शेळके यांच्या मालकीचे घर आहे. त्यामध्ये मीनाक्षी शिवाजी भोसले या भाडोत्री राहतात. त्या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दुपारी दीड वाजता घरातून धूर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या मिलिंद गायकवाड यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ज्युबीलंट लाईफ सायन्सेसच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. मंगेश कदम, सचिन कुलकर्णी व अतुल सोनवणे यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.या वेळी पंचायत समिती सदस्य गोरखनाथ माने, ग्रामपंचायत सदस्य विजय शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस व महसूल प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला असून, भोसले यांच्या घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य, भांडी, एलईडी टीव्ही, फ्रिज, मिक्सर, लाकडी शोकेस असे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.