इंदापूर : तमाम इंदापूरकरांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा विषय नगर परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत अवघ्या तीन मिनिटांत तहकूब ठेवण्यात आला.थकीत वीजबिल भरण्यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत येत्या एक-दोन दिवसांत बैठक होईल. चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, असे या सभेत स्पष्ट करण्यात आले. इंदापूर नगर परिषदेच्या मालोजीराजे सभागृहात पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.सर्वोच्च न्यायालयाने राज्य व महामार्गापासून पाचशे मीटर अंतरात असणारी दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीमधून सुटण्याकरिता, महामार्गाचा नगर परिषदेच्या हद्दीतील भाग हस्तांतरित करून घेण्याचे मनसुबे दारूधंदेवाल्यांनी रचले. त्यामध्ये नगरसेवकांनाही सहभागी करून घेतले असल्याची चर्चा शहरात होत होती. त्यामुळे लोकांना उत्सुकता लागून राहिली होती.(वार्ताहर)
इंदापूर नगरपालिकेची सभा तीन मिनिटांत तहकूब
By admin | Published: March 22, 2017 3:06 AM