शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सव्वा नऊ हजार नागरिकांना मिळणार हक्काचं घर

By admin | Published: April 13, 2017 3:37 AM

जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ९ हजार २९३ नागरिकांना यावर्षी हक्काची घरं देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पुणे : जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ९ हजार २९३ नागरिकांना यावर्षी हक्काची घरं देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात ६ हजार १११ घरकुल, रमाई योजनेअंतर्गंत २ हजार ४०९ घरकुल, तर शबरी योजनेअंतर्गंत ८०७ घरकुल मंजूर झाले आहे. लवकरच ही घरकुले बांधली जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेर्तंगत सर्वांसाठी घर याप्रमाणे २०२२ पर्यंत एक कोटी घरे देण्याची घोषणा केली आहे. २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षणमधून लाभार्थ्यांची निवड केली जाणार होती. केंद्र शासनाने या योजनेची अमंलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा परिषद ६ हजार १११ घरकुले बांधणार आहे. लाभार्थ्याला घर बांधायचे झाल्यास दीड लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांला कमी टक्के व्याजदरांनी ७० हजार रुपायांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. मनेरगा अतंर्गत काम करून लाभार्थ्याला १८ हजार मिळणार आहे. तसेच शौचालय बांधण्यासाठीही रक्कम मिळणार आहे. जिल्हा परिषद वर्षभरामध्ये विविध योजनाच्या माध्यमातून दहा हजार घरकुल बांधणार पंतप्रधान आवस योजना, रमाई योजना, शबरी योजना, पारधी योजना अशी विविध योजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद वर्षभरामध्ये ९ हजार २९३ घरकुल बांधणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प अधिकारी दिनेश डोके यांनी सांगितली. ...अशा अटींतून केली छाननी बेघर, भिक्षेकरी गृहातील बेघर, हाताने मैला उचलणारे, आदिम जमाती, कायद्याने बंदमुक्त केलेले वेठबिगार यांना प्राधान्य मिळेल. विशेष म्हणजे घरांच्या कामांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. सुमारे दीड लाख रुपयांचे अनुदान त्यासाठी मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी खुला वर्ग, अल्पसंख्याक, एससी, एसटी जाती वगार्तील लाभार्थी असावा. दोन, तीन अथवा चारचाकी वाहने नसावीत. तीन, चारचाकी शेतीची वाहने नसावीत, किसान क्रेडिट कार्ड असल्यास त्याची मर्यादा ५० हजारांपेक्षा जास्त नसावी, शासकीय नोकरी नसावी, नोंदणीकृत बिगरशेती व्यवसाय नसावातालुकानिहाय लाभार्थी : इंदापूर (१११९), जुन्नर (९४६), बारामती (८३८), खेड (६४७), दौंड (५३१), आंबेगाव (३९५), मावळ (३२३), पुरंदर (३०१), शिरूर (२२७), हवेली (२२४), भोर (२१५), मुळशी (१४९), वेल्हे (९६). शबरी आवास योजनेअंतर्गत ८०७ घरे अनुसूचित जमातींसाठी असेलेल्या शबरी योजने अंतर्गंत जिल्ह्यात ८०७ घरे बांधण्यात येणार आहेत. घर मिळविण्यासाठी ती व्यक्ती अनुसूचित जातीची, त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उत्पन्न १ लाखाच्या आतमध्ये आवश्यक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. जिल्हातील रहिवासी असल्याचे पुरावे सादर करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.तालुकानिहाय निवडलेले लाभार्थी : जुन्नर (३०८), आंबेगाव (२१३), खेड (१६४), मावळ (८४), इंदापूर (१३), वेल्हे (८), भोर (८), बारामती (५), हवेली (४), शिरूर (०), दौंड (०), मुळशी (०), पुरंदर (०).तालुकानिहाय निवडलेले लाभार्थी : भोर (१००), मुळशी (२१९), मावळ (६२), बारामती (४०५), शिरूर (२०९), आंबेगाव (९५), दौंड (२७२), खेड (१२१), हवेली (१५९), वेल्हे (३३), पुरंदर (११३), इंदापूर (४८८), जुन्नर (१३३)