पुणे : पुण्यातल्या ज्या मंडाळावर गुन्हा दाखल झाला अाहे त्या मंडळाचे दहीहांडीसाठी मला निमंत्रण नव्हते, तसेच त्या मंडळाला मी अाेळखतही नाही. दहीहांडीच्या दिवशी मी पुण्यातही नव्हताे, मी माझ्या घरी हाेता, असे असताना माझ्यावर ध्वनी प्रदुषण अाणि सरकारी कामात अडथळा अाणल्याचा गुन्हा कसा काय दाखल हाेताे ? असा संतप्त सवाल अभिनेते संताेष जुवेकर यांनी केला अाहे. तसेच कुठलिही परवानगी न घेता फ्लेक्सवर माझा फाेटाे लावणाऱ्या मंडळाविराेधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.
दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा आणल्याने पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज माल, साऊंड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंट माल विजय नरुटे अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.
संताेष जुवेकर म्हणाले, गुन्हा दाखल झालेल्या मंडळाशी माझा काहीही संबंध नाही. माझं त्यांच्याशी काहीही बाेलणंही नाही तसेच त्यांचं मला अामंत्रणही नव्हतं. मी दहीहांडीच्या दिवशी माझ्या घरी हाेताे. त्या मंडळाला मी अाेळखतही नाही. पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्याअाधी ज्याचा या गाेष्टीशी संबंध नाही त्याच्यावर कसा गुन्हा दाखल करायचा याचा विचार करायला हवा. माझी कुठलिही परवानगी न घेता माझा फाेटाे बॅनरवर छापल्याप्रकरणी मी संबंधित मंडळाच्या विराेधात कायदेशीर कारावाई करणार अाहे. कलाकारांची परवानगी न घेता फाेटाे छापून ते लाेकांची दिशाभूल करत अाहेत. गेल्या दाेन वर्षांपासून मी मानधन घेऊन कुठल्याही दहीहांडी साेहळ्याला जात नाही. माझ्या सिनेमाचे प्रमाेशन असेल तरच मी या साेहळ्यांना जाताे.