पुण्यात उरवडे मध्ये लागलेल्या आगीत तब्बल १८ जणांचा हरपळून मृत्यू झाला आहे.यात बहुतांश मृत या महिला आहेत. या सगळ म महिला आजुबाजुच्या परिसरातून या कंपनीत कामाला येत होत्या. उरवडे, पिरंगुट, भादस, बालगुडी, पौड येथील रहिवासी असणाऱ्या महिलांच्य घरातली परिस्थीती गरीबीची आहे. कंपनीत पाणी शुध्दीकरण करणाऱ्या गोळ्यांच्या पॅॅकींगचे काम त्या करत होत्या. आजही हेच काम सुरू होते. त्यावेळी शॉॅर्टसर्कीट झाले. नेमकी याच विभागाला आग लागली. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या महिलांचा मृत्यू झाला.
अर्चना कवडे, संगिता गोंदे, मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगिता पोळेकर, माधूरी अंबोरे, मंदा कुलत, त्रिशाला जाधव, सीमा बोराडे, गीता दीवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार अशी महिलांची नावे आहेत.
एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीस ही कंपनी निंकुज शहा यांच्या मालकीची आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी ही कंपनी सुरू झाली. पाणी शुध्द करण्यासाठीच्या गोळ्या बनविण्याचे काम येथे होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून येथे सॅॅनीटायझर बनविले जात होते. पाणी शुध्द गोळ्या करण्यासाठी आरएम १ नावाचे रसायन वापरले जाते. ते अत्यंत ज्वालाग्रही आहे. त्याचे पॅकेजींग सुरू असताना शॉॅर्टसर्कीट झाल्याचा अंदाज आहे.
ज्वलनग्राही रसायनांचा वापरू असूनही नाही फायर सिस्टिम
एसव्हीएस ॲक्वा या कंपनीत ज्वलनग्राही रसायनांचा वापर होत होता. मात्र, तरीही या कंपनीत अग्निरोधक यंत्रणा (फायर सिस्टिम) नाही, असा आरोपही केला जात आहे.मृत्यूच्या आधी एकमेकांना कवटाळलेया कंपनीला लागेली आग इतकी भीषण होती की कंपनीच्या दरवाज्यातून प्रवेश करणे अवघड झाले होते. त्यामुळे कंपनीच्या पाठिमागील बाजूची असलेली भिंत जेसीबीच्या साहाय्यानं पाडून रस्ता करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी साधारणपणे दोन ते तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग एवढी भीषण होती की ती नियंत्रणात येत नव्हती. संपूर्ण आग नियंत्रणात येताच या आगेमधून अठरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या मृतदेहांची अवस्था इतकी भयानक होते की हे मृतदेह स्त्रीयांचे आहेत की पुरूषांचे हे ओळखणेही कठीण झाले होते. हृदय हेलावून टाकणारी बाब म्हणजे चार मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत आढळले. आगीत सापडल्यानंतर जीवाच्या आकांतने चौघांनी एकमेकांना मिठी मारली असावी, परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. चौघांचेही मृतदेदह कवटाळालेल्या अवस्थेतच बाहेर काढण्यात आले.