शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जुन्नर तालुक्यात किती बिबटे ? वन खात्याला माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 2:24 AM

साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी वाघ, बिबट्या, लांडगे, तरस ही जंगली श्वापदं गावालगत येत असत;

राजुरी : जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असून तालुक्यात किती बिबटे आहेत, याचा अंदाज खुद्द वन खात्याला माहिती नाही. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी वाघ, बिबट्या, लांडगे, तरस ही जंगली श्वापदं गावालगत येत असत; परंतु त्यांचा वावर हा शक्यतो डोंगरात असणाऱ्या गुहा, कपारी यांमध्ये असे. बिबट्या हा एक मांजरवर्गीय प्राणी, अतिशय चपळ, जवळजवळ ४० किलोमीटर परिघामध्ये आपले साम्राज्य वसवतो. काळ बदलला जमिनीचे भाव गगनाला भिडले; त्यामुळे वृक्षतोड वाढली, परिणामी जंगलक्षेत्र कमी होऊ लागले, जंगलांना लागलेले की लावलेले वणवे या व इतर कमी-अधिक समस्यांमुळे जंगलातील श्वापदांना जंगलात मिळणारी शिकार कमी झाली. जुन्नर तालुक्यातील येडगाव, पिंपळगावजोगा, वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी या जुन्नर तालुक्याला वरदान ठरणारी पाचही धरणे आणि कालव्यांचे जाळे यामुळे जमिनी चांगल्यापैकी ओलिताखाली आल्या व तालुक्यातील एक व शेजारील तालुक्यातील साखर कारखानदारीमुळे शेतकरी कमी श्रमाच्या ऊसशेतीकडे वळला व सैरभैर झालेल्या बिबट्यांना मानवनिर्मित वस्तीस्थान तयार झाले आणि त्यांचा मानवी वसाहतीजवळचा वावर वाढू लागला आणि याच ठिकाणी संघर्षाची ठिणगी पडली. ऊसशेतीजवळ असणाºया पाळीव जनावरांवर बिबट्याचा उदरनिर्वाह होऊ लागला, परंतु येथेही पाळीव जनावरे बंदिस्त होऊ लागल्याने बिबट्याच्या नजरेत बसू लागला, दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकू लागली, आज काय तर माणसांवर हल्ला, तर उद्या पाळीव प्राण्यांवर हल्ला, आजकाल तर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत, अशा बातम्या वर्तमानपत्रात ठळक ठसठशीत येऊ लागल्या.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गोलेगाव-पिंपळगाव परिसरात बिबट्याच्या दर्शनाने घबराटीचे वातावरणात पसरले आहे. विशेष म्हणजे, रविवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी उसाच्या शेतालगत बिनधास्त विहार करणारा बिबट्या पाहिल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. साबळेवाडी, कोयाळी भानोबाची, मरकळ, मोहितेवाडी, बंगलावस्ती, दौंडकरवाडी, रामनगर, साबळेवस्ती, चिंचोशी आदी ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे. दौंडकरवाडी, पोतलेमळा, कोयाळी-भानोबाची गावात पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून जनावरे, तसेच पाळीव कुत्री फस्त केली आहेत.