कोणत्या वयोगाटातील मुलांनी किती वेळ स्क्रीनवर असावा याबाबत जागितक आरोग्य संघटनेने काही गाईडलाईन्स दिली आहेत. मुलांना सध्या मोबाईल , संगणक द्यायचे नाहीच असे धोरण सध्या चुकीचे ठरू शकते. मोबाईल, संगणक ही काळाची गरज आहे. पूर्वी शाळेत मोबाईलला परवानगी नसायची मात्र आता मोबाईलवरच शाळा भरते हे वाक्यच मोबाईलची व संगणकाची गरज किती आहे हे स्पष्ट करते. शाळा असो, अभ्यास असो किंवा साऱ्याच गोष्टी करताना मुलं स्कीनवर किती वेळ असावीत याची काही ढोबळ गणितं जागतिक आरोग्य संघटनेने जारी केली आहेत.
WHO च्या गाईडलाईन्स अशा-
- एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना थोडावेळही स्क्रीन समोर बसवू नये शिवाय त्यांना दिवसातून किमान अर्धा तास तरी पोटावर झोपवावे. जमिनीवर विविध खेळण्या ठेवून त्यामध्ये त्यांना पालथे झोपवून सोडावे त्या खेळण्या घेण्यासाठी जाण्याचा प्रयत्न ते करतात ते त्यांच्या शारिरिक विकासासाठी पोषक ठरते.
- एक ते दोन वर्षाच्या मुलांसाठी दिवसातून जास्तीजास्त एक तास स्क्रीन समोर ठेवण्यास हरकत नाही, मात्र एक तासापोक्षा जास्त ते स्क्रीन समोर असतील तर त्यांच्या डोळ्यांवर थेट परिणाम व्हायला सुरवात होते. या वयातील मुलांना किमान तास शारिरिक ॲक्टिव्हिटी करणे अपेक्षित आहे शिवाय या वयातील मुलांना गोष्टी सांगणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अधिक फायद्याचे ठरते.
- तीन ते चार वर्षाच्या मुलांना तासभर स्क्रीन समोर ठेवण्यास हरकत नाही, मात्र तुलनेने त्यांच्या शारिरिक ॲक्टिव्हिटी दोन वर्षाच्या मुलांपेक्षा अधिक असण्याचे सल्ले आरोग्य संघटनेने दिल्या आहेत.
- सुमारे पाच वर्षाच्या पुढील मुलांनी साधारण दोन तासापर्यंत स्क्रीन पाहण्यास हरकत नाही, मात्र स्क्रीन सलग पाहत बसण्याऐवजी मध्ये ब्रेक घेणे महत्वाचे आहे, त्यामुळे डोळ्यावर स्क्रीनचा प्रकाश पडून त्यामाध्यमातून आलेला थकव्याला आराम मिळते.
- मोठ्या मुलांनीसुध्दा स्कीन सलग न पाहता अर्धा तासाभराने स्क्रीन वरून नजर हटवावी, सातत्याने खूप वेळ स्क्रीन पाहणे झाले असल्यास ब्रेक घेतल्यावर डोळे थंड पाण्याने धुवून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.