शहरातील मुख्य चौकात पाहणी केली असता अनेक जण केवळ वाहतूक पोलिसांच्या दंडापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरतात, असे दिसून आले. चौकात वाहतूक पोलीस आहेत का, याची खातरजमा करूनच हनुवटीचा मास्क नाकावर सरकवला जातो. मात्र, कोरोना आणि आता नव्याने शिरकाव केलेल्या डेल्टाचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. शहरात दुसरी लाट ओसरली असली, तरी डेल्टाचे संकट डोक्यावर आहे, याकडे दुर्लक्ष केले तर पुन्हा नवीन संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अंगवळणी पडलेली सवय सोडत, काळजी घेणे गरजेचे आहे.
मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, असे समजून अनेकजण आता निष्काळजीने विनामास्क तसेच हनुवटीला मास्क लावून फिरताना दिसून येत आहेत. मात्र, अशा बेशिस्त व्यक्तींवर पोलिसांची चांगलीच नजर असल्याचे दिसून येत आहे. चौकात वाहतूक पोलीस नसतील तर बिनधास्त मास्क हनुवटीवर आणला जातो. मात्र पोलिसांची करडी नजर असल्याने कारवाई कडक केली जात आहे.
पोलिसांकडून मास्कचे तंतोतंत पालन
शहरातील मुख्य चौकांमध्ये मास्क परिधान न केलेल्या वाहनचालकांवर कडक कारवाई पोलिसांकडून करण्यात येते. मध्यंतरी पोलीसच मास्क वापरत नसल्याचे किंवा हनुवटीवर लावत असल्याचे समोर आले होते. मात्र, आता पोलिसांकडून मास्कचे तंतोतंत पळत होत असल्याचे दिसून आले.
लसीकरणाची गती वाढण्याचे नाव घेईना
वयोगट लसीकरण स्थिती
१८ ते ४४ २२,१५,५२६ १,१५,२०३
४५ ते ५९ ११,७३,८८७ ६,७३,९९६
६० पेक्षा जास्त ९,४४,८४३ ५,८९,००३