पुणे : इयत्ता बारावीच्या निकालात जिल्ह्यात सर्वत्र मुलींचाच दबदबा राहिला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह सर्व तालुक्यातील एकत्रित निकालामुळे मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक राहिली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर दुसरीकडे सात तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये मुलांच्या उत्तीर्णतेची संख्या ९० टक्क्यांच्या खाली आहे.
पुणे जिल्ह्याचा एकुण निकाल ९२.२४ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील परीक्षा दिलेल्या १ लाख २३ हजार ६५५ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १४ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीच्या राज्याच्या निकालात मुलीच बाजी मारतात. यंदाही हे चित्र बदललेले नसून राज्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातही मुली आघाडीवर आहेत. परीक्षेला बसलेल्या ५७ हजार १५ मुलींपैकी ५४ हजार ४३३ मुलींना यश मिळाले आहे. तर एकुण ६६ हजार ६४० मुलांपैकी ५९ हजार ६२३ मुले उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्यात आंबेगाव तालुका अव्वल ठरला असून ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल बारामती (९३.९८), शिरूर (९३.८६), जुन्नर (९३.७४), दौंड (९३.५७) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. पुणे शहर पुर्व भाग व पश्चिम भागाचा निकाल ९०.३२ व ९१.३५ एवढा आहे. तर पिंपरी चिंचवडचा निकाल ९३.५३ टक्के लागला आहे.
जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.५७ टक्के, कला शाखेचा ८०.८७ आणि वाणिज्य शाखेचा ९२.२० टक्के निकाल आहे. श्रेणीनिहाय गुणांमध्ये १५ हजार ८८४ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. तर ४४ हजार २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.-------------------पुणे जिल्ह्याचा तालुकानिहाय निकालतालुका निकालाची टक्केवारीपुणे शहर (पुर्व) ९०.३२पुणे शहर (पश्चिम) ९१.३५पिंपरी चिंचवड ९३.५३आंबेगाव ९६बारामती ९३.९८भोर ९०.७६दौंड ९३.५७हवेली ९२.२३इंदापुर ९३.४८जुन्नर ९३.७४खेड ९२.८३मावळ ८९.११मुळशी ९३.३३पुरंदर ९२.८७शिरूर ९३.८६वेल्हा ९०.६६एकुण ९२.२४-------------------------जिल्ह्याचा विद्यार्थीनिहाय निकाल परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारीमुले ६६,६४० ५९,६२३ ८९.४७मुली ५७,०१५ ५४,४३३ ९५.४७एकुण १२३६५५ ११४०५६ ९२.२४-----------------------------------------जिल्ह्याचा शाखानिहाय निकालशाखा परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारीविज्ञान ४७,९३४ ४६,७७० ९७.५७कला २१,००५ १६,९८६ ८०.८७वाणिज्य ४९,४४५ ४५,५५८ ९२.२०व्यवसाय ५२७१ ४७१२ ८९.३९-----------------------जिल्ह्याचा श्रेणीनिहाय निकालविशेष श्रेणी - १५८८४प्रथम श्रेणी - ४४०२०द्वितीय श्रेणी - ४९८५५उत्तीर्ण श्रेणी - ४२९७----------------------