डिंभे: मंचर-भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात काल रात्री अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. या मुळे हा रस्ता काही काळ वहातुकीसाठी ठप्प झाला होता. प्रशासनाने कोसळलेल्या दरडीचा ढिगारे बाजूला करत या घाटातून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
अतिवृष्टीमुळे या घाटातील संरक्षक भींत वाहून गेल्याने घाटात रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी आज मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून त्यामुळे परिसरात मोठे नुकासन झाले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरु असलेली संततधार सुरू असून आदिवासी भागातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. आजपर्यंत या भागात एकुण ५१० मीमी. एवढा पाऊस झाला आहे.
बुधवारी रात्री पावसाचे प्रमाण अचानक वाढल्याने मंचर-भीमाशंकर या राज्य महामार्गावरील पोखरी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. घाटात काही ठिकाणी मोठमोठे दगडू रस्त्यावर वाहून आले आहेत. गोहे पाझर तलावाच्या वरच्या बाजूला घाटाच्या वरची बाजू खचून दगड व माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे. काही झाडेही उन्मळून रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद झाला होता.
या घटनेची माहीती मिळताच पूणे जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पटील , आंबेगांव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश पठाडे यांनी या ठिकाणी जावून परीस्थितीची पहाणी केली. या घाटातील खोळंबलेली वहातुक सूरू करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दगड व मातीचे ठिग बाजूला करण्याच्या सुचना दिल्या. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या दरडीचे अवशेष सर्वच्या सर्व एकदम बाजूला करणे शक्य नसल्याने खालच्या बाजून राडारोडा बाजूल करत हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला असून सध्या या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु झाली आहे.
आज दिवसभर घाटात अनेक ठिकाणी पडलेले मोठमोठे दगड, बांधकाम केलेल्या गटारातील माती तसेच रस्त्यावरील राडारोडा दोन जेसीबी व ट्रक्टरच्या सहाय्याने उचलण्याचे काम सुरू होते. मात्र झालेल्या संतत धार पावसामुळे या घाट रस्त्याची दुरावस्था झाली असून संरक्षक भींत, गटारे व साईट पट्टया वाहून गेल्याने या घाटरस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
--
फोटो क्रमांक २३डिंभे मंचर-भीमाशंकर अतिवृष्टी
सोबत फोटो. - २३ जुलै२०१९ डिंभे पी १
ओळी - पी१- मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील दरडीचे अवशेष करण्यात आले असून या घाटातून सध्या एकेरी वहातूक सुरू झाली आहे.(छायाचित्र- कांताराम भवारी)