याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, नगर रोडवरील फर्निचर शोरूम आहे त्या ठिकाणी गाद्या व इतर घरगुती फर्निचर तयार करून विक्री केले जाते त्याला दुकानाला ही आग लागली होती. आग इतकी प्रचंड होती की त्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. जवळच असलेल्या माजी जि. प. सदस्य रामदास दाभाडे, काका जाधवराव व स्थानिक ग्रामस्थांसह पाण्याचे टँकर बोलून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली तर ही आग विझविण्यासाठी सचिन महाजन यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीए, अग्निशमन दलाचे तीस जवान व एकूण चार गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने या आगीवर दोन तासांत नियंत्रण मिळविले असले तरी या आगीची झळ बाजूच्या दुकानातील थोडेफार साहित्य तसेच ऑफिसमधील संगणक, फाईल्स व कागदपत्रे जळून खाक झाले. आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळविले अन्यथा बाजूची दुकानं जळून खाक झाला असती तर मोठी दुर्घटना घडली असती परंतु वाघोली ग्रामस्थांच्या आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली हेच म्हणावे लागेल.
*************
१) वाघोलीत अनेक मोठे गोडाऊन आणि शोरूम असून त्यांना अद्ययावत कर्मचारी, सिक्युरीटी आणि आगरोधक साहित्य नाहीत.
२) परिसरातील गोडाऊनचे फायर ऑडिट आतापर्यंत करून घेण्यात आलेलेच नाहीत ही बाब उघड झाली आहे.
३) आग विझविण्यासाठी लागणारी यंत्रणा व शोरूम व्यवस्थापन अपयशी ठरले असल्याचे मदतीसाठी धावलेल्या स्थानिक तरुणांनी सांगितले.
४) व्यावसायिकांच्या चुकीमुळे सर्वच यंत्रणेला धरले जाते वेठीस, इन्शुरन्ससाठी नुकसान होते लाखात दाखविले जाते करोडोत.
---------
आग लावली कि लागली ?
एक वर्षात पाच ठिकाणी लागल्या आगी.
कटकेवाडी येथील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनला आग लागली होती ती आग दोन दिवस धुमसत होती. या सर्व घडामोडीमुळे वाघोली परिसरातील गोडाऊन आणि शोरूमला आग लावली जाते का? लागते? असा प्रश्न सर्वसामान्य पडला असून याची चर्चा वाघोली परिसरात सुरू आहे. वाघोलीतील फर्निचर दुकानाला लागली भीषण आग.