कोरेगाव भीमा/लोणीकंद (जि. पुणे) : एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभ या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी देशभरातून अनेक भीमसैनिक येत असतात. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक परिसरात ८१० पोलीस, राज्य राखीव दलाच्या २१ कंपन्या तैनात आहेत.कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एक जानेवारी २०१८ या शौर्यदिनी अचानक झालेल्या दंगलीमुळे हे ठिकाण चर्चेत आले होते.मागील वर्षीपासून प्रशासन दोन महिने आधीच कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. या कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच लोकप्रतिनिधींच्या अनेक बैठका होऊन या ठिकाणी सुमारे आठ ते दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त, अनेक अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, दुर्बीण यांच्यासह आदी अत्यावश्यक सुविधांची सोय करण्यात आली आहे.
कोरेगाव भीमाला छावणीचं स्वरूप; मोठा फौजफाटा तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 2:52 AM