यवत : लडकतवाडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मूठभर धान्य उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी धान्य जमा करून २९० किलो धान्य प्राजक्ता मतिमंद विद्यालयास दान केले.शाळेचे मुख्याध्यापक नारायण शेंडे यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनदंन केले. लहान मुलांना कृतीमधून संस्कार व्हावेत, यासाठी तसेच शाळेत असा उपक्रम राबवून समाजाचे काहीतरी देणे लागतो, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी, यासाठी तसेच दुसऱ्यांना मदत करण्याची भावना निर्माण होणे गरजेचे असल्याने शाळेत उपक्रम राबविला असल्याचे या वेळी शेंडे यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने मूठभर याप्रमाणे विद्यालयात २९० किलो धान्य जमा झाले. हे धान्य सुपा (ता. बारामती) येथील प्राजक्ता मतिमंद विद्यालयासाठी दान केले. प्राजक्ता मतिमंद विद्यालयाचे संस्थापक जयराम सुपेकर यांनी या वेळी मतिमंद विद्यालयातील संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती सांगितली. तसेच शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमसाठी लडकतवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप लडकत, सदस्य शुभांगी लडकत, प्राजक्ता मतिमंद विद्यालय संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पोपट होले, रमेश लडकत, सदाशिव लडकत, शारदा होले, राधा होले उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवथापन सुजाता गायकवाड व जयसिंग ताम्हणे यांनी केले. सूत्रसंचालन शरद नातू तर आभार सतीश कोळपे यांनी मानले.
लडकतवाडी शाळेत ‘मूठभर धान्य’ उपक्रम
By admin | Published: November 10, 2015 1:34 AM