भोसरी : आपल्याला अनावश्यक असलेले कपडे गोरगरीबांपर्यंत पोहोचावेत यासाठी शहरात ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला एकूणच अवकळा आली आहे. गरजूंसाठी नव्हे तर फेकून द्यायचे म्हणून येथे कपडे आणून टाकले जात आहेत. त्यातच हा उपक्रम सुरू करणाºयांनीही भिंतींकडे पाठ फिरवल्याने टाकाऊ कपडे, कचºयाचे ढीग या भिंतींसमोर साचले आहेत. माणुसकीच ‘खचल्या’ने या भिंती निरुपयोगी ठरू लागल्या आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरूकेला. नागरिकांनी नवीन कपडे खरेदी केल्यानंतर जुन्या कपड्यांचे काय करायचे? असा प्रश्न अनेकांसमोर असतो. त्यामुळे एकीकडे कपड्यांची वानवा असलेले गोरगरीब तर दुसरीकडे जुन्या कपड्यांचे काय करायचे? या चिंतेत असलेले नागरिक असे चित्र समाजात दिसून येते. जुने परंतु चांगल्या स्थितीत वापरलेले कपडे गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ते माणुसकीच्या भिंतीवर आणून टांगण्याची सोय या उपक्रमांतर्गत करण्यात आली. सामाजिक भावनेतून चांगल्या स्थितीतील जुने कपडे याठिकाणी आणून टाकले जात होते. गरजूंनीही सुरुवातीला या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय कार्यकर्त्यांमार्फत माणुसकीची भिंत सुरू करण्याची चढाओढ सुरू झाली. पिंपरीतील तीन ठिकाणी, चिखली, भोसरी, सांगवी, वाकड आदी ठिकाणी माणुसकीची भिंत सुरू करण्यात आली. काही राजकीय कार्यकर्त्यांनी ‘माणुसकीच्या भिंती’वर टाकलेली कपडे धुवून, इस्त्री करून गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उचलली. मात्र, महापालिका निवडणूक पार पडताच. राजकीय कार्यकर्त्यांनी भिंतींकडे पाठ फिरवली. काही नागरिकांनी फाटलेली, टाकाऊ स्वरूपातील कपडे फेकून देण्याऐवजी माणुसकीच्या भिंतीवर आणून टाकण्यास सुरुवात केली. हे कपडे जीर्ण झालेले तसेच वापरण्यासही योग्य नसल्याने गरजूंनीही या भिंतींकडे पाठ फिरवली आहे.कपड्याचे ढीग साचत असताना नागरिक याठिकाणी कचरा टाकत आहेत. शहरातील एकाही ठिकाणची ‘माणुसकीची भिंत’ वापरात नाही. या भिंतींना अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. कपड्याच्या ढिगातून ऊब मिळवण्यासाठी सध्या मोकाट जनावरांचा याठिकाणी ठिय्या आहे.>शहरातील माणुसकीच्या भिंतीची अवस्था पाहता माणुसकीच हरवल्याचे पहायला मिळत आहे. टाकाऊ कपड्यांबरोबरच याठिकाणी कचरादेखील टाकला जात आहे. त्यामुळे अशा भिंतींच्या परिसरात अस्वच्छता वाढत चालली आहे. हा उपक्रम चांगला आहे. त्यामुळे सामाजिक योगदानातून हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. राजकीय हेतूने सुरू झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ वगळता इतर ठिकाणी सामाजिक संस्थांनी सुरू केलेला हा उपक्रम पुढे सुरू रहावा यासाठी महापालिकेच्या नागर वस्ती विभागामार्फत धोरण ठरवणे गरजेचे आहे.- संदेश बोºहाडे, अध्यक्ष, यूथ फॉर क्राईस्ट फाउंडेशन
माणुसकीची खचली भिंत, कचराकुंडीसारखा केला जातोय वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:13 AM