शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

मानवता परमो धर्म : मोफत उपचार करून अपंग गायीला बसवला 'कृत्रिम' पाय;पुण्याजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 1:09 PM

कृत्रिम अवयव बसवणे मानवी लोकांमध्ये सामान्य आहे. मात्र, प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया फार दुर्मिळ...

ठळक मुद्देसंचेती रुग्णालयाच्या टीमचा पुढाकार; वजनदार प्राण्यांच्या अवयवांची रचना करणे अवघड

पुणे : पुण्यामधील चौफुला गावातील एका गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्यात आला आहे. या कृत्रिम पायाच्या मदतीने लवकरच ही गाय ल चार पायांवर चालू शकणार आहे. अपंग गायीवर शस्त्रक्रिया करून २ ऑगस्ट रोजी हा कृत्रिम पाय बसवण्यात आला. गायीला तीनच पाय होते. गावकऱ्यांनी तिला संचेती रूग्णालयातील प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स विभागातील डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्याचे आव्हान स्विकारले आणि सर्व उपचार मोफत देण्यात आले.

संचेती रुग्णालयाच्या प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स विभागाचे प्रमुख डॉ. सलिल जैन म्हणाले, 'कृत्रिम पाय तयार करण्यासाठी आम्ही त्या पायाचे माप दोन आठवड्यांपूर्वीच घेतले. माझ्या टीमने गायीच्या शरीररचनेचा अभ्यास केला आणि त्यानंतर कृत्रिम पायाची रचना तयार केली. वजनदार प्राण्यांच्या अवयवांची रचना करणे अवघड असते. कृत्रिम पाय लावल्यावर ही गाय आता उभी राहण्यास सक्षम असून ती हळूहळू चालू शकत आहे. परंतु, कृत्रिम पायाशी जुळवून घेण्यासाठी तिला जवळपास एका महिन्याचा कालावधी लागेल. आम्ही तिच्या पायाच्या हालचालींवर आणि त्यामध्ये होणाऱ्या प्रगतीवर लक्ष ठेवत आहोत. गावकरी अमर जगताप ज्यांनी या गायीच्या कृत्रिम पायाच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला.

 -------कृत्रिम अवयव मानवी लोकांमध्ये सामान्य आहे. मात्र प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया फार दुर्मिळ आहे. जास्त वजन असलल्या प्राण्यांसाठी प्रोस्थेटिक्स एक असामान्य गोष्ट आणि आव्हानात्मक कार्य आहे. प्राण्यांवर हे करण्यासाठी अनेक चाचण्या व त्रुटी पडताळून पाहणं आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी एका तीन पायांच्या गाढवावर आम्ही ही प्रक्रिया केली होती. गाढवाला कृत्रिम पाय बसवल्यावर यश मिळाल्यानंतर यावर्षी आम्ही गायीवर ही प्रक्रिया केली. अशा समस्या असलेल्या अनेक प्राण्यांना आम्ही मदत करू शकू.

- डॉ. पराग संचेती, संचेती इंस्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडीक आणि रिहॅबिलीटेशनचे प्रमुख-------प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी रूग्णालयाच्या या कामगिरीचं कौतुक केले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, प्राण्यांसाठीच्या कृत्रिम गोष्टी तयार करण्यासाठी अधिकाधिक संशोधन केले पाहिजे. पेटा इंडियाचे सीईओ मणिलाल वल्लीयाते म्हणाले, 'वजनदार प्राण्यांसाठीच्या कृत्रिम पायाची प्रक्रिया आव्हानात्मक असते. यामध्ये वजनाचा योग्य प्रमाणात समतोल राखण्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे.जनावरांसाठी देशात असे आणखी उपक्रम आवश्यक आहेत. 

टॅग्स :PuneपुणेcowगायOrgan donationअवयव दानdoctorडॉक्टर