पुणे : मोतीबिंदूमुळे दृष्टिहीन झालेला एक श्वान संभाजी उद्यानात आहे. दोन्ही डोळ््यांनी काहीही दिसत नसल्याने त्याला खाण्याचीही भ्रांत असते. उद्यानात फिरणारे काही नागरिकच त्याला थोडेफार खायला देतात. त्यातीलच एका प्राणीमित्राने श्वानाची ही अवस्था पाहून काही प्राणीमित्र संस्थांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. मात्र, या प्राणीमित्र संस्थांनी श्वानाला आसरा देण्यास टाळाटाळ केल्याने संवेदनशीलतेची दृष्टीच हरपल्याचे दिसून आले.संभाजी उद्यानात गेल्या काही दिवसांपासून एक दृष्टिहीन श्वान अडखळत फिरत आहे. श्वानाच्या डोळ््यांकडे पाहिले, की त्याला मोतीबिंदू झाल्याचे लक्षात येते. उद्यानातील एकाच ठिकाणी तो दिवसभर बसून असतो. कधी भूक लागली तर तिथल्या तिथेच वास घेत अन्न शोधत असतो. उद्यानात फिरायला येणाऱ्यांना त्याची कीव आली तर ते त्याला खायला टाकतात, अन्यथा उपाशी राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. त्यातच उद्यानात काही भटके श्वान असून या श्वानाला त्रास देतात. काहीच दिसत नसल्याने हा त्रास सहन करणे त्याला भागच आहे. उद्यानात दररोज सकाळी फिरायला येणारे काही जण या श्वानाला खायला घेऊन येतात. त्यामध्ये गणेश पानसरे हे प्राणीमित्रही असतात. त्यांना या श्वानाचे हाल पाहवले नाहीत म्हणून त्यांनी काही प्राणीमित्र संस्थांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. या श्वानाच्या डोळ््याची शस्त्रक्रिया करणे किंवा त्याला कायमस्वरूपी आसरा देण्याची विनंती त्यांना संबंधितांना केली. मात्र, त्यांच्याकडून विविध कारणे पुढे करीत टाळाटाळ करण्यात आली.(प्रतिनिधी)४याविषयी अधिक माहिती देताना पानसरे म्हणाले, ‘शहरालगतच्या तीन संस्थांच्या प्रतिनिधींना दूरध्वनीवरून श्वानाची माहिती दिली. त्यातील एका संस्थेने डोळ््यांच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च आहेत, तोपर्यंत संस्थेमध्ये ठेवू शकणार नाही, असे उत्तर दिले. ४दुसऱ्या संस्थेने तुम्ही स्वत: त्या श्वानाला आणून सोडा, असे सांगून हात झटकले. तर तिसऱ्या संस्थेने नव्याने कोणताही प्राणी निवाऱ्यासाठी घेत नसल्याचे थेट सांगून टाकले. संबंधित संस्थांना अनेक सवलती मिळतात.४ स्वत:ला प्राण्यांचे आश्रयदाते म्हणत या संस्था लाखो रुपयांच्या देणग्याही घेतात, त्यामुळे त्यांच्याकडून प्राण्यांना आसरा मिळण्याची अपेक्षा सामान्य नागरिक करतात. मात्र, या संस्थांकडूनच याबाबत टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. ४ श्वानाला अनेकजण खायला टाकतात, अन्यथा त्याला उपाशीच रहावे लागत आहे.
माणुसकीच्या संवेदनशीलतेची दृष्टी हरपली
By admin | Published: December 31, 2014 12:13 AM