दौंड : दौंड शहरात गेल्या दोन दिवसात सुमारे १00 मोकाट कुत्री पकडण्यात आली आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला होता. काही कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. तर गेल्या दोन वर्षात कुत्रं चावल्याने दोन वेगवेगळ्या लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, अचानक दुचाकी वाहनांसमोर येणे, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. तर दुसरीकडे कुत्रे चावल्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. गेल्या दीड ते दोन महिन्यात २0 ते २५ नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्यामुळे अनेक नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणून नगर प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार शहरातील विविध भागातून पिंजरा लावून मोकाट कुत्री पकडण्यात आली आहे. बुधवारी ४५ तर गुरुवारी ५५ कुत्रे पकडण्यात आली आहेत.
दौंडला दोन दिवसांत पकडले तब्बल शंभर मोकाट कुत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:20 PM
गेल्या दीड ते दोन महिन्यात २0 ते २५ नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या होत्या.
ठळक मुद्देअंगावर धावून जाणे, अचानक दुचाकी वाहनांसमोर येणे, यामुळे अपघाताचे वाढले प्रमाण