कृषी पर्यटनातून शेकडो हातांना रोजगार - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:46 AM2018-09-26T01:46:57+5:302018-09-26T01:47:10+5:30
ग्रामीण भागातील महिलांनी व तरुणांनी कृषी पर्यटनासारखा व्यवसाय केल्यास गावातील शेकडो हातांना रोजगार मिळेल. तसेच, पर्यटन व्यवसायामुळे देशाची आर्थिक सुबत्तेत वाढ होईल, असे प्रतिपादन तरडोली (ता. बारामती) येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मोरगाव - ग्रामीण भागातील महिलांनी व तरुणांनी कृषी पर्यटनासारखा व्यवसाय केल्यास गावातील शेकडो हातांना रोजगार मिळेल. तसेच, पर्यटन व्यवसायामुळे देशाची आर्थिक सुबत्तेत वाढ होईल, असे प्रतिपादन तरडोली (ता. बारामती) येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
येथील महिला शेतकरी संगीता हनुमंत भापकर यांनी कृषी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गांडूळ खत, व्हर्मी वॉश प्रकल्प, सेंद्रीय भाजीपाला उत्पादन आदी विषयी मार्गदर्शन व विविध उद्देशांसाठी कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे.
ग्रामीण भागातील महीलेने उभारलेल्या या केंद्राची पाहणी पवार यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, जिरायती भाग पाणी परीषद अध्यक्ष हनुमंत भापकर आदी उपस्थित होते.
पवार यांनी कृषी पर्यटन केंद्रातील गांडुळ खत प्रकल्प व तयार उत्पादन सेंद्रिय भाजीपाला याविषयी माहिती घेतली. तसेच प्रत्येक शेतकºयाने शेतीपूरक व्यवसाय केल्यास शेतकºयांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असे पवार यांनी सांगितले.