शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

बंद पीएमपी बसचे सुटेना ग्रहण, पीएमपीच्या शेकडो गाड्या वर्कशॉपमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 2:31 AM

आरटीओ पासिंग, देखभाल-दुरुस्ती, अपघात अशा विविध कारणांमुळे शेकडो बस वर्कशॉपमध्येच उभ्या आहेत. बंद बसचे हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या सुमारे ४५०, तर भाडेतत्त्वावरील १५० हून अधिक बस मार्गावर येत नाही.

पुणे : आरटीओ पासिंग, देखभाल-दुरुस्ती, अपघात अशा विविध कारणांमुळे शेकडो बस वर्कशॉपमध्येच उभ्या आहेत. बंद बसचे हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या सुमारे ४५०, तर भाडेतत्त्वावरील १५० हून अधिक बस मार्गावर येत नाही. त्यात ब्रेकडाऊनची भर पडत असल्याने प्रवाशांना सक्षम सेवा पुरविण्यात प्रशासनाला सातत्याने अपयश येत आहे.‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे २१०० बस असून, त्यामध्ये भाडेतत्त्वावरील ६५३ बसेसचा समावेश आहे. पीएमपीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, रविवारी २२ हजार ४१६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी केवळ १८ हजार ४८१ फेºया होऊ शकल्या. तसेच मार्गावर १७८० बस सोडण्याचे नियोजन असताना केवळ १३७७ बस येऊ शकल्या. सोमवारच्या (दि. १३) स्थितीमध्ये त्यात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसले. या दिवशी सुमारे १५०० बस मार्गावर आणण्यात आल्या असून, मागील काही दिवसांतील हा सर्वोच्च आकडा असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामध्ये भाडेतत्त्वावरील ४९० गाड्यांचा, तर पीएमपीच्या मालकीच्या केवळ १००८ गाड्यांचा समावेश आहे. जवळपास ६०० गाड्या सोमवारी मार्गावर आल्या नाहीत.एकुण बंद गाड्यांमध्ये आरटीओ पासिंगच्या गाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. दि. ६ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार, पीएमपीच्या मालकीच्या २८ बस आरटीओ पासिंगसाठी सज्ज होत्या. तर १२८ बसेसचे पासिंगसाठीचे काम सुरू होते. पीएमपीचे पासिंगचे काम दररोज होत नाही. त्यामुळे या बसेसच्या संख्येत दररोज वाढ होते. हे काम दररोज झाल्यास पासिंग अभावी सुमारे १५० बस बंद राहणार नाहीत, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. पासिंगशिवाय देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी या दिवशी ७४ बस बंद होत्या. तर भांडार विभागाकडे बसेससाठी आवश्यक साहित्य नसल्याने ४६ बस बंद ठेवाव्या लागल्या. अपघात, तोडफोड किंवा इतर कारणांमुळे नुकसान झालेल्या ४५ बस असून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. तर ३८ बस मार्गावर येण्याच्या अवस्थेत नाहीत. या दिवशी ४१२ बस अशा विविध कारणांमुळे बंद राहिल्या. या बंद बसेसमध्ये सोमवारी (दि. १३) तब्बल ९० बसेसची भर पडली. भाडेतत्वावरील १६३ गाड्या बंद होत्या.‘ब्रेकडाऊन’ची भरएकीकडे सुमारे ५०० बस मार्गावर येत नसताना मार्गावर आलेल्या बसपैकी दररोज शंभरहून अधिक बसचे ब्रेकडाऊन होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ब्रेकडाऊन झालेल्या बसपैकी काही बस जागेवरच दुरुस्त करून पुन्हा मार्गावर आणल्या जातात. तर अनेक बसला थेट वर्कशॉपमध्ये न्यावे लागते. त्यामुळे या बस दिवसभरात पुन्हा मार्गावर येत नाहीत. त्याचा पीएमपीच्या संबंधित मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम होऊन प्रवाशांना खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे.‘पीएमपी’च्या विनंतीनुसार बसच्या पासिंगसाठी दिवस निश्चित केला जातो. त्या वेळी अधिकारीही उपलब्ध करून दिले जातात. काही दिवसांपूर्वीच ५५ बसच्या पासिंगचे काम करण्यात आले. तसेच तपासणीसाठी आलेल्या बहुतेक बसमध्ये त्रुटी आढळत नाहीत. त्यामुळे पासिंगचे प्रमाणही चांगले आहे.- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे