शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

माननीयांच्या रांगेत साडेतीन हजार इच्छुक

By admin | Published: January 14, 2017 3:52 AM

महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, सर्वच पक्षांनी आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांची चाचपणी

पुणे : महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, सर्वच पक्षांनी आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांची चाचपणी केली आहे़ मागील वेळी दोनच्या प्रभागावरून यंदा ४ चा प्रभाग केला असला तरी नगरसेवक होण्यासाठी पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली असून, १६२ जागांसाठी प्रमुख पक्षांकडे तब्बल ३ हजार ३४८ हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे़ किमान पाच वर्षांसाठी ते माननीय बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागले आहेत़ राजकारणात आपले स्थान निर्माण करण्यासाठी नगरसेवक होणे ही कोणत्याही कार्यकर्त्याची पहिली पसंती असते़ राजकारणातील ही पहिली पायरी समजली जाते़ ही पहिली पायरी सर करण्यासाठी अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे प्रयत्न करीत असतात़ निवडणुका जशा जवळ येत गेल्या, तशा या कार्यकर्त्यांनी मतदारांवर आपली छाप पाडण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्नही केले़ पक्षाने उमेदवारीसाठी अर्ज मागविले तेव्हा आपल्या उमेदवारीचा दावा अधिक भक्कम करण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले़ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच बहुतेक पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम उरकला आहे़ आता त्यांच्यातून योग्य उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सर्वच पक्षांत सुरू झाली आहे़ केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे़ भाजप कार्यालयातून १ हजार ९२ इच्छुकांनी अर्ज नेले होते़ त्यापैकी ८७० जणांनी प्रत्यक्ष अर्ज भरून पक्षाकडे सादर केले़ त्यात ४९० पुरुष तर ३८० महिला इच्छुकांचा समावेश होता़ प्रत्यक्षात ८५१ जणांनी मुलाखतीला हजर राहून उमेदवारीसाठी आपणच कसे लायक आहोत, याविषयी आपले म्हणणे सादर केले़ गेल्या १० वर्षांपासून महापालिकेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या अधिक आहे़ पक्षाकडून ६७० इच्छुकांनी अर्ज नेले होते़ त्यापैकी ५७५ जणांनी मुलाखती दिल्या़ शहरातील २ ते ३ प्रभागांत पक्षाकडे मोजक्या इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे़ भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये यापूर्वीच्या महापालिका निवडणुकांमध्ये युती झाली होती़ यंदा अशी युती होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शिवसेनेकडेही उमेदवारी मागणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे़ शिवसेनेकडे जवळपास ७०० जणांचे अर्ज गेले होते़ त्यापैकी ६८७ जणांनी मुलाखती दिल्या आहेत़ युती होणार नसल्याने स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेने केल्याने आजवर भाजपासाठी सोडल्या जाणाऱ्या जागांवर कार्यकर्त्यांना तयार करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असूनही सत्तेचा पुरेसा वाटा मिळाला नसल्याची व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक नगरसेवकांनी पक्षांतर केलेल्या काँग्रेस पक्षातही इच्छुकांची कमतरता नाही़ ६१५ इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडून अर्ज नेले होते़ त्यापैकी ५४० जणांनी अर्ज भरले़ प्रत्यक्षात ५३५ जणांनी मुलाखती देऊन उमेदवारीसाठी दावा केला़ त्यात ३२५ पुरुष आणि २१० महिलांचा समावेश आहे़ गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या करिष्म्याने तब्बल २९ जागांवर झेंडा फडकविणाऱ्या मनसेमधून गळती सुरू झाल्याची चर्चा असली तरी पक्षाकडे इच्छुकांची कमरतता नसल्याचे दिसून आले आहे़ पक्षाकडून ५७५ जणांनी अर्ज घेतले होते़ त्यापैकी ५२५ जणांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत़ उरलेल्या ५० जणांच्या मुलाखतीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे़ खडकमाळ आळी - महात्मा फुले पेठ या प्रभाग क्रमांक १८ मध्ये तब्बल २० जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे़ याशिवाय बावधन-कोथरूड डेपो प्रभाग क्रमांक १० आणि ताडीवाला रोड-ससून हॉस्पिटल प्रभाग क्रमांक २० मध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे़ कोथरूड, पर्वती, कसबा, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांत प्रामुख्याने अधिक इच्छुक आहेत़राज्यपातळीवर भाजपबरोबर रिपब्लिकन पक्षाची युती असली तरी महापालिकेत भाजपा आरपीआयला किती जागा देणार हे अजून निश्चित झालेले नाही़ आयपीआयने २८ जागांची मागणी केली आहे़ त्यादृष्टीने पक्षाकडे ६५ जणांनी उमेदवारी मागितली असून, त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला आहे़ बहुजन समाज पार्टीने शहरात आता जम बसविण्यास सुरुवात केली आहे़ महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे़ आतापर्यंत पक्षाकडे ६० जणांनी उमेदवारी मागितली आहे़ याशिवाय अन्य छोटे पक्षही आपले अस्तित्व दाखविण्यासाठी या निवडणुकीत आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहेत़ त्यामुळे १६३ जागांसाठी किमान साडेतीन हजारहून अधिक जण इच्छुक असून, शहरातील माननीय बनण्याचे स्वप्न पाहत आहेत़ (प्रतिनिधी)