लॉकडाऊनमुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ; पाच ते सहा तास दुकाने सुरु ठेवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:43 PM2020-04-21T15:43:03+5:302020-04-21T15:44:15+5:30

उत्पन्नाचे मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्याने नाभिक समाजातील कुटुंबे अडचणीत

Hunger strike time on nabhik samaj due to lockdown | लॉकडाऊनमुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ; पाच ते सहा तास दुकाने सुरु ठेवण्याची मागणी

लॉकडाऊनमुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ; पाच ते सहा तास दुकाने सुरु ठेवण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देबारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन

बारामती : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिकांनी २० मार्चपासून स्वत:हुन दुकाने बंद ठेवले आहेत. आता मात्र उत्पन्नाचे मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्याने नाभिक समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यापैकी बरेच नाभिक व्यवसाय हे भाडेतत्त्वावर आहेत. कुटुंबाच्या आर्थिक गरजा कशा पूर्ण कराव्या ,हा आर्थिक प्रश्न कुटुंब प्रमुखांसमोर उभा राहिला आहे.

बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष नवनाथ आपुणे यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना याबाबत निवेदन दिले आहे. या महाभयंकर कोरोनापासून बचाव करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या काळजीपोटी सर्व सलून दुकाने बंद ठेवली आहेत.दुकाने बंद ठेवल्याने व्यवसायठप्प झाले आहेत.  या परिस्थितीत नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने  नाभिक समाजाचा विचार करावा.

बारामती शहरातील सलूनदुकाने पाच ते सहा तास उघडण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
 खबरदारी म्हणून व्यवसाय करताना नियमावली तयार करून आपली व ग्राहकांचीकाळजी घेण्याची दक्षता घेवु. व्नाभिक समाजास कोणत्याही प्रकारची आर्थिकमदत मिळाली नाही. बारामती तालुका नाभिक संघटनेकडून आर्थिक मदतीसाठीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यातआले आहे. समाजावर उपासमारीची वेळ आली आहे, यासाठी सहकार्य करावे, अशीमागणी करण्यात आली आहे.
———————————

Web Title: Hunger strike time on nabhik samaj due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.