तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत तयार केलेल्या रिंगरोड वरील तीर्थक्षेत्र देहू आणि येलवाडीला जोडणाऱ्या इंद्रायणी पुलाजवळ प्रलंबित असलेले अर्धवट काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच नितीन गाडे व काही सहकारी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे .
तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पाच ते सहा वर्षांपूर्वी सुरू केलेले रिंगरोड व त्यावरील पूल, पथदिवे तयार करण्यात आले. मात्र देहू आणि येलवाडी या दोन गावांना जोडणारा (फेज १.१ रस्ता) इंद्रायणी नदीवरील नवीन पूल तयार करण्यात आल्यानंतर येलवाडी (ता. खेड) हद्दीतील एका शेतकऱ्याचे भूसंपादन प्रक्रियेचा प्रश्न निर्माण झाल्याने हे काम सुमारे तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहे. सुमारे तीन वर्षांपासून प्रत्येक यात्रेच्यापूर्वी भाविक वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची नियोजन आढावा बैठकीत संबंधित केलेले रिंगरोड व त्यावरील पूल, पथदिवे तयार करण्यात आले. मात्र देहू आणि येलवाडी या दोन गावांना जोडणारा (फेज १.१ रस्ता) इंद्रायणी नदीवरील नवीन पूल तयार करण्यात आल्यानंतर येलवाडी (ता. खेड) हद्दीतील एका शेतकऱ्याचे भूसंपादन प्रक्रियेचा प्रश्न निर्माण झाल्याने हे काम सुमारे तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहे.
मागच्या वर्षी मार्च महिन्यातील बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आढावा बैठक झाली असताना बैठकीत उपस्थित मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी संबंधित शेतकऱ्याला बोलावून घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपस्थित असलेले पदाधिकारी यांचा समझोता करीत तात्पुरता तोडगा काढला. यात्रा झाल्यानंतर मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रखडलेले काम तसेच अर्धवट आहे.
यात्रेनंतर आता दुसरे वर्ष आले तरी अद्यापपर्यंत प्रश्न प्रलंबित आहे. हे काम अपूर्ण असल्यामुळे वारंवार अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित शेतकऱ्याच्या भूसंपादन प्रक्रियेत त्यावर अन्याय होऊ नये . तसेच देहू-येलवाडी (फेज १.१) या रस्त्यावर शासनाकडून निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी केली असून, कामाजवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच नितीन गाडे व सहकाऱ्यांनी दिला आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत तयार केलेल्या रिंगरोड वरील तीर्थक्षेत्र देहू आणि येलवाडीला जोडणाऱ्या इंद्रायणी पुलाजवळ प्रलंबित असलेले अर्धवट काम