मंचर : आंबेगाव तालुक्यातील नांदूर येथे बिबट्याने पारडाचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे. या ठिकाणी पिंंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नांदूर गावामध्ये बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच, या ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध आहे. वायाळमळा येथे रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास शेतकरी पुरुषोत्तम वायाळ यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला चढविला. शेळीचा ओरडण्याचा आवाज आल्याने पांडुरंग वायाळ, गणेश वायाळ, तुषार वायाळ, रघुनाथ वायाळ, बाबाजी वायाळ यांनीही बिबट्याला हकलण्यासाठी आरडाओरडा केला. त्यामुळे या बिबट्याने तेथून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी झाली. ही घटना ताजी असताना नांदूर गावठाणातील संपत खंडू भालेराव यांच्या पारडावर बिबट्याने हल्ला चढविला. बिबट्याच्या हल्ल्यात पारडू ठार झाले आहे. त्यामुळे शेतकरी संपत भालेराव यांचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून नांदूर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून २ जनावरांवर हल्ला झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ ऊसशेती मोठ्या प्रमाणावर आहे.मृतावस्थेत आढळला बिबट्याओतूर : ओतूर (ता. जुन्नर) पासून जवळच असलेल्या (पानसरेवाडी) पानसरे पटातील शरयू आनंद पानसरे यांच्या शेतात मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आल्याची माहिती ओतूर विभागाचे वनक्षेत्रपाल बी. सी. बेळे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना वनक्षेत्रपाल बेळे म्हणाले, आज सकाळी पानसरे वस्तीवर एक बिबट्या मृतावस्थेत आहे, असा दूरध्वनीवरून वस्तीवरील नागरिकांनी कळविले.मी स्वत: वनकर्मचारी ,वनरक्षक अडागळे ,राठोड ,खरोडे घटनास्थळी गेलो बिबट मृतावस्थेत पाहून रितसर पंचनामा केला. हा बिबट्या सुमारे चार वर्षे वयाचा असून तो नर जातीचा आहे डिंगोरे (ता. जुन्नर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धिंदाळे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर उदापूर येथील रोपवाटीकेत त्याचे दहन केले.शाळा परिसरातील उसाच्या क्षेत्रात बिबट्या दडून बसला असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी पिंंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ दिवसासुद्धा घाबरू लागले आहेत. त्यांना मुलांना शाळेत पाठविण्याची भीती वाटू लागली आहे. दरम्यान, वनखात्याचे कर्मचारी एस. बी. खुंटे यांनी नांदूर येथे भेट दिली. कळंब येथे चार दिवसांत तब्बल ३ बिबटे जेरबंद झाले होते.
नांदूर येथे भुकेल्या बिबट्याने पाडला पारडाचा फडशा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 12:23 AM