पुणे : वाटेगाव सारख्या गावांतून मुंबईत आलेल्या अण्णाभाऊंना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. रोजच्या जगण्याच्या लढाईत आण्णाभाऊंनी हमाली, बुट पाॅलीश, द्वारपाल, ईलेक्ट्रीकच्या वायर ओढणे, ढकलगाडी, रंगा-याचे काम, श्रीमंत लोकांची कुत्री सांभाळणे आदी कष्टप्रद काम केली. ही काम करीत असतांना कधी घाटकोपर तर कधी चंबुर झोपडपट्टीत ते राहत होते. ही सर्व कष्टाची काम अण्णाभाऊंनी केल्याने श्रमीक, वंचित, शोषीत हा त्यांच्या विचारांचा गाभा राहिला. त्या सर्व श्रमिकांच्या हुंकार म्हणजे अण्णाभाऊंचे साहित्य होय असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले.
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या संघठनेतर्फे देशात धर्म जाती भेदाच्या ताणतणावात अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतचा दिपस्तंभ या विषयावर महाचर्चाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी सबनीसांनी हे विचार मांडले.
कुलगुरु डाॅ. पी.डी.पाटील यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डाॅ. सर्जेराव निमसे उपस्थित होते. साहित्यीक लक्ष्मण माने, साहित्यीक प्रा. डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे, मुंबई विद्यापीठातील शाहिर अमर शेख लोककला अकादमीचे समन्वयक प्रा. डाॅ. प्रकाश खांडगे या महाचर्चात सहभागी झाले होते.
सबनीस म्हणाले,माकर्सवादाचा झेंडा हाती घेतल्यानंतर जातीं-पातींच्या सर्व सिमारेषा आण्णाभाऊंनी ओलांडल्या. त्यांच्या कथा, कांदब-या, कवी, वगनाट्य, पोवाडे आदी साहित्य प्रकारातूंन त्यांनी सकारात्मक नायक आणि नायीका सादर केली. त्यांचया शब्दातील ताकदीमुळे उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहयचे तर अन्यायग्रस्त, पिढीत शोषीतांचे रक्त खवळून उठायचे. अण्णाभाऊंनी गवाणकर, शाहीर अमर शेख यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती संग्रमात झोकुन देऊन ढोलकी आणि ढफीच्या थापावर संग्राम उभा केला. अण्णाभाऊंचे कार्यकर्तृत्व केवळ एका जाती पुरता मर्यादीत नाही. त्यांनी रशीया पासून भारतातील आदीवासी भागापर्यंत मजल मारलेली दिसून येते. त्यांचे लाल बावटा पथकाने तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चाॅंदबिबि सारख्या मुस्लिम महिलेने त्यांना मुंबईत राहण्यासा जागा दिली. आण्णा भाऊंनी सुमारे 35 कादंब-या लिहिल्या. त्यांच्या साहित्यावर आधारीत 12 चित्रपट तयार झाले. ए.के. हनगल, बलराज सहानीं सारखे हिंदीचित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार श्रमिक, शोषीतांचा हुंकार म्हणजे अण्णाभाऊंचे साहित्य डाॅ. श्रीपाल सबनीस अण्णाभाऊंच्या साहित्यात्या प्रेमात होते. पंरतू मराठी साहित्याची समीक्षा करणा-या समिक्षकांनी आण्णाभाऊंच्या साहित्याची समिक्षा, दखल घेतली नाही, हे खेदाने म्हणावसे वाटते.
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांनी प्रास्ताविकाद्वारे महाचर्चा आयोजनामागची भुमिका विषद केली.