लोकमत न्यूज नेटवर्कभोर : नीरा देवघर धरण भागात अनेक वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. या टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना राबवून टंचाई दूर करून हिर्डोशी खोऱ्यातील गावे टँकरमुक्त करणार, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी व्यक्त केला उत्रौली-कारी गटातील नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील महाड-पंढरपूर रोडवरील टंचाईग्रस्त गावात टंचाई पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता उदय चाटे, शाखा अभियंता गायकवाड, विस्तार अधिकारी पी.डी साळुंके, पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे, स्वप्निल जाधव, सुनील भेलके, धनंजय शिरवले, देवा मसुरकर,गणेश साळुंके, सागर साळेकर, संतोष साळेकर, अंकुश साळेकर, पदमाकर डोंबाळे, किसन दिघे, बबन पोळ, अंकुश कंक, सुधीर शिरवल, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी साळव, भांबटमाळ, रेणुसेवाडी, धारांबेवाडी, धानवली, पऱ्हर बु., पऱ्हर खु., गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली बु., कुडली खुर्द, दुर्गाडी, मानटवस्ती, चौधरीवस्ती, अभेपुरी, माझेरी, शिरगाव, अशिंपी, उंबार्डेवाडी, शिळिंब या गावात जाऊन पाण्याच्या स्रोताची पाहणी केली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडून मंजूर केलेल्या शिवकालीन साठवण टाक्यांच्या कामांची व जलयुक्त शिवार योजनेतून सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. टंचाईग्रस्त गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, निधी उपलब्ध करुन भविष्यात टंचाई कायमची दूर करून सर्व गावे टँॅकरमुक्त करणार असल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले.
हिर्डोशी खोऱ्यातील गावे टँकरमुक्त करणार
By admin | Published: May 12, 2017 4:55 AM