शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

संतापजनक ! पत्नीनं पैसे दिले नाहीत म्हणून पतीनं 4 महिन्यांच्या बाळाला आपटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 1:34 PM

पतीने पत्नीकडे दोनशे रुपये मागितले. तिने दोनशे रुपये नाहीत असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले.

ठळक मुद्देबाळाच्या डोक्याला दुखापत महिलेने बाळाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पिंपरी : किरकोळ कारणावरून पिंपरीतील बौद्धनगर येथे पती पत्नीचे भांडण झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. भांडणाचा राग पतीने बाळावर काढला. बाळाला उचलून जमिनीवर आपटले. त्यात बाळ गंभीर जखमी झाले असून पुण्यातील ससून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीने पतीविरोधात पिंपरी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी दत्ता देशमुख (वय २८, रा. बौद्धनगर) असे फिर्याद दाखल करणा-या महिलेचे नाव आहे. दत्ता अनिल देशमुख (वय ३४)असे आरोपीचे नाव आहे. पती दत्ता देशमुख याने पत्नी शुभांगीकडे दोनशे रुपये मागितले.

तिने दोनशे रुपये नाहीत असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. या भांडणाचा राग पतीने बाळावर काढला. कसलाही विचार न करता चार महिन्याच्या चिमुकल्याला उचलून जमिनीवर आपटले. बाळाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. फिर्यादी महिलेने बाळाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंडे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाPoliceपोलिस