शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

फिरायला घेतली कार, पत्नी-मुलाला मारून पती फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:09 AM

मुलगा होता ऑटिझमग्रस्त : मध्य प्रदेशातून नातेवाईक येणार पुणे : धानोरी परिसरात वास्तव्यास असलेल्या आलिया शेख (वय ३५) आणि ...

मुलगा होता ऑटिझमग्रस्त : मध्य प्रदेशातून नातेवाईक येणार

पुणे : धानोरी परिसरात वास्तव्यास असलेल्या आलिया शेख (वय ३५) आणि आयान शेख (वय ६) या माय-लेकरांच्या निर्घृण खुनानंतर त्यांचे मृतदेह सासवड व कात्रज घाटात वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचे मंगळवारी (दि. १५) आढळले होते. आलियाचा पती आणि आयानचा पिता आबिद शेख बेपत्ता असून त्यानेच हे खून केल्याचा संशय असल्याने पोलिसांचा सर्व तपास त्याच्यावरच केंद्रित झाला आहे.

सातारा रस्त्यावर भाड्याने घेतलेली कार ‘पार्क’ करून रस्ता ओलांडून जात असलेला आबिद शेख सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. तेथून तो कोठे निघून गेला, याचा शोध सुरू आहे. खून झालेला मुलगा ‘ऑटिझम’ग्रस्त (स्वमग्नता) असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सासवड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी सांगितले की, आबिद शेख मूळचे मध्य प्रदेशातील विदिशा येथील आहेत. सध्या एका विमा कंपनीत व्यवस्थापक असलेले आबिद हे सन २००७ मध्ये नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास आले. नुकतेच ते धानोरीतून चऱ्होलीमध्ये राहायला गेले होते. आलिया शेख याही एका खासगी कंपनीत काम करत होत्या. मात्र, मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याचे समजल्यानंतर हे कुटुंब तणावात होते. काही महिन्यांपासून मुलाला शिकविण्यासाठी घरी एक शिक्षिका ठेवली होती.

आबिद हे पत्नी आणि मुलाला घेऊन दर शनिवार-रविवार बाहेर फिरायला जात. सकाळी फिरायला गेलेले हे कुटुंब रात्री परतायचे. त्याप्रमाणे गेल्या शुक्रवारी ११ जून रोजी त्यांनी भाड्याने कार घेतली होती. दोन दिवसांसाठी घेतलेली कारची मुदत त्यांनी आणखी वाढविली होती. १४ जून रोजी आबिद कुटुंबाला घेऊन सासवड, दिवेघाट, बनेश्वर, बोपदेव घाट, दिवे घाटातून पुन्हा सासवडला गेला होता. तेथे त्याने रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास गाडीतच आलियाचा खून केल्याची शक्यता आहे.

आलियाचा मृतदेह सासवडजवळील खळद गावानजीकच्या हॉटेलच्या बाजूला पोलिसांना सापडला. त्यानंतर त्याने गाडी पुन्हा कात्रज-दत्तनगर चौक, कात्रज नवा बोगदा येथे नेली. तेथे मुलाचा खून करून त्याचा मृतदेह टाकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानंतर १५ जूनच्या मध्यरात्री एक वाजता त्याने गाडी सातारा रस्त्यावर पार्क केली. त्यानंतर तो स्वारगेटच्या दिशेने चालत गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे.

विदिशातील नातेवाईकांनी त्याला १४ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फोन केला होता. त्यावेळी त्याने अर्धा तासात घरी पोहोचतो, असे सांगितले होते. त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. १५ जून रोजी त्याचा संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा विदिशातील नातेवाईकांनी ही बाब पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकाला सांगितली. ते शेख यांच्या घरी गेले असता तेथे घराला कुलूप आढळले.

आबिद शेख यांना भाड्याने कार देणाऱ्या कंपनीचे अधिकारीही तेथे आले होते. त्यांचाही शेख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी त्यांनी कारवरील जीपीएस यंत्रणेद्वारे तिचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती कार सातारा रस्त्यावर पार्क केल्याचे आढळून आले. गाडीत मुलाचे कपडे व खाण्याचे साहित्य होते. मागील सीटवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसत होते. आलियाच्या शवविच्छेदन अहवालात जबर मारहाण केल्याने व आयानच्या शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

चौकट

आबिदवरच संशय

“संपूर्ण घटनाक्रम पाहता आबिद हाच पत्नी व मुलाचा खून करून स्वत: पळून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व लक्ष आबिदचा शोध घेण्यावर केंद्रित केले आहे. आबिद जोपर्यंत प्रत्यक्ष सापडत नाही तोवर या दुहेरी खुनामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार नाही. त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.”-

श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त़

चौकट

सुखवस्तू कुटुंबातला प्रेमविवाह

खून झालेल्या आलिया यांचे वडील मध्य प्रदेशात वनाधिकारी होते. फरार असलेल्या आबिदचे वडील जिल्हा योजना अधिकारी होते. त्यांचा भाऊ कॅनडामध्ये असतो. आबिद आणि आलिया यांचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला त्यांच्या विवाहाला घरातून विरोध होता. मात्र वर्षभरानंतर तो मावळला.

चौकट

तांत्रिक विश्लेषणाची मदत

“सध्या तरी संशय आबिदवरच आहे. सातारा रस्त्यावर गाडी पार्क करून तो निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते. अन्य ठिकाणी तो दिसून येतो का, तो कोठे निघून गेला याबाबत तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. आलिया आणि आबिद या दोघांचे नातेवाईक मध्य प्रदेशातून पुण्यात येत आहेत. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर अधिक माहिती मिळू शकेल.”

-अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त.