पुणे : पती-पत्नी नात्यात अनेकदा इतरांनी पाहू नये, असे फोटो काढले जातात. जोपर्यंत त्यांच्या नात्यात गोडवा असतो, तोपर्यंत ते ठिक असते. परंतु, काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो, त्यातूनच मग पत्नीची बदनामी केली जाते. अन् एकांत क्षणाचे फोटो व्हॉटस्ॲपवर व्हायरल होतात. एका पतीने आपल्या पत्नीचे अश्लील फोटो वेगवेगळ्या व्हॉटसअॅप ग्रुपवर शेअर केले. ही बाब पत्नीला समजल्यावर तिने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
कोंढवा पोलिसांनी उंड्री येथे राहणाऱ्या ३८ वर्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१४ पासून आजपर्यंत सुरु असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या पतीने त्यांचे अश्लील फोटो तसेच स्वत:चे अश्लील व्हिडिओ वेगवेगळ्या व्हॉटसअॅप ग्रुपवर शेअर करुन फिर्यादी यांची बदनामी केली. सहायक पोलीस निरीक्षक दगडे अधिक तपास करीत आहेत.