शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

हैदराबाद- मुंबई लक्झरी बसला भीषण अपघात, ४ ठार

By admin | Published: January 21, 2017 8:38 AM

हैदराबादहून मुंबईला येणा-या लक्झरी बसला इंदापूरजवळ भीषण अपघात झाला असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
इंदापूर, दि. २१ -  हैदराबादहून मुंबईला येणा-या लक्झरी बसला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. 
लक्झरी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होवून झालेल्या भीषण अपघातात बसमधील चार जण जागीच ठार झाले.बारा जण जखमी झाले आहेत.त्या पैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोलनाक्यापासून काही अंतरावर आज  (दि.२१ )सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 श्रवण केंद्रे(वय २५ वर्षे,रा.डोंबिवली),विशाल गोकुळ लाड (वय ३२ वर्षे,रा.विजयंतनगर, देवळाई, सातारा),घंटा करणाकर (वय ३२ वर्षे,रा.हैदराबाद ),अमीरउल्ला बाबावल्ली खान (वय ३५ वर्षे,रा.फोर्ट व्हील काॅलनी, उप्परपल्ली, राजेंद्रनगर,जि.रेगारेड्डी) अशी मरण पावलेल्या प्रवाशांची नावे आहेत. प्रितेश पटेल (वय ३६ वर्षे,रा.अहमदाबाद ), राजेश माणिक शितोळे(वय ४६ वर्षे,रा.वाघोली), निलेश सोमनाथ मिळशेटे (रा.पाली मरली,ता . कऱ्हाड,जि.सातारा),निलेश अशोक गोडबोले (रा.बदलापूर) हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.या संदर्भात संदीप सदाशिव धनवडे (वय ३० वर्षे,रा.न्यू पनवेल,सेक्टर ४ गुरुधाम सोसायटी,जि.रायगड) यांनी फिर्याद दिली आहे.त्यावरुन  उस्मान हाफीज सय्यद (वय ४५ वर्षे, रा.बसवकल्याण, जि.बिदर,कर्नाटक)  या लक्झरी बस चालका विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
    पोलीसांनी सांगितले की,उस्मान हाफीज  सय्यद हा बस चालक रात्री दहा वाजता आपल्या ताब्यातील लक्झरी बस (क्र.ए.पी. २३ वाय २२२२ ) मध्ये चाळीस प्रवाशांना घेवून हैदराबाद वरुन मुंबईला निघाला होता.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाका ओलांडून पुढे येत असताना, भरधाव वेगातील बसवरचे त्याचेे नियंत्रण सुटले. दुभाजकावरुन बस रस्त्याच्या डाव्या बाजूला आली. पलटी होवून महामार्गाच्या कडेला असणारी पानटपरी उद्ध्वस्त करुन,एका हाॅटेलचे पार्किंग तोडून ती स्वच्छतागृहाच्या टाकीजवळ अडकली.फौजदार डी.एस.कुलकर्णी अधिक तपास करत आहेत.